✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)
चिमूर(दि.12ऑगस्ट):-मुग्दाई चँरीटेबल ट्रस्ट पहाडी परिसर डोमा येथे विश्व आदिवासी मुलनिवासी दिनानिमित्त विविध वृक्षांचे रोपण करण्यात आले. यावेळी डॉ. भगवान नन्नावरे, ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. रामराव नन्नावरे आल्लापली, ग्रामपंचायत डोमाचे सरपंच अल्काताई वाकडे, उपसरपंच विशाल नन्नावरे, सदस्य उषा चौधरी, ज्योती धनविजय, विश्वनाथ वाकडे उमरेड, भूगर्भ विभाग वर्धाचे सेवानिवृत्त नारायण गजभे, माजी मुख्याधापक देवराव नन्नावरे, शंकर भरडे नागपुर, विठोबा हनवते, विठोबा नन्नावरे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ. भगवान नन्नावरे यांनी विश्व आदिवासी मुलनिवासी दिनाचे महत्व तथा वनहक्क अंतर्गत पेसा कायदा, पाचवी व सहावी सूची तसेच होणा-या २०२१ च्या जणगणनेत आदीवासी धर्म सर्व आदीवासीनी नोंद करावी यावर मार्गदर्शन केले. तसेच ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. रामराव नन्नावरे यांनी मुग्दाई हे ठिकाण पर्यटन व्हावे यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ट्रस्टचे सचिव पुरुषोत्तम रंदये जांभूळघाट यांनी केले तर उपस्थितांचे आभार उपसरपंच विशाल नन्नावरे यांनी मानले. वृक्षारोपण कार्यक्रमाला माना आदिवासी महासभेचे पदाधिकारी तसेच समाजबांधव बहुसंखेने उपस्थित होते.