?राठोड फौंडेशन यांच्याकडून बरकत भाई पन्हाळकर यांना राज्यस्तरीय कोरोना योद्धा पुरस्कार प्रदान
✒️कोल्हापूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)
कोल्हापूर(दि.3ऑक्टोबर):-आयुष्यात संकटे येतातच, संकटे असले की, संघर्षाची प्रेरणा, जिद्द आणि जगण्याची ऊर्जा सुद्धा निर्माण होते. नव्या रूपात आलेल्या संकटा सोबत बळ ही मिळते. त्यांना चांगले करण्याची प्रेरणा आणि संधी देऊन ज्यांनी गरीब, गरजू व निराधार लोकांना दोन्ही हात मोकळे करून सेवा केली ते खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रातील कोरोना योद्धा आहेत. अशा शब्दात मध्यवर्ती कारागृह चे पोलीस अधीक्षक(SP) चंद्रमणी इंदुलकर यांनी संकट काळातील धावलेल्या महाराष्ट्रातील कोरोना योद्धा विषयी कृतज्ञता व्यक्त केली.
डी. जी. राठोड फौंडेशन यांच्याकडून राज्यस्तरीय कोरोना योद्धा सन्मानकार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. 2 ऑक्टोंबर महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह येथे हा कार्यक्रम पार पडला.
कोरोना काळात भरीव कार्य केल्याबद्दल बरकतभाई पन्हाळकर यांना कोरोना योद्धा म्हणून कोल्हापूरी फेटा, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन पुरस्कृत करण्यात आले.यावेळी अध्यक्षस्थानी इंडियन ऑइल चे मॅनेजर विजय जाधव, दैनिक जनमत चे उपसंपादक सुरेश राठोड यांच्या शुभहस्ते बरकत भाई पन्हाळकर यांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्रातील मनसे दक्षिण विभागीय संघटक दिलीप पाटील, हॉलीबॉल खेळाडू व प्रशिक्षक गौरव खामकर, कॅरम राष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक गौरव हुदले, बुद्धिबळ राष्ट्रीय पंच व प्रशिक्षक भरत चौगुले, डॉ. ईश्वर पाटील, सर्जेराव पाटील, ऋषिकेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.