Advertisements
✒️प्रतिनिधी खामगाव(मनोज नगरनाईक)
खामगाव(दि.39ऑक्टोबर):-समाज प्रबोधनपर कार्यासाठी अखिल गुरव समाज संधटना चे राष्र्टिय अध्यक्ष अँड.अण्णासाहेब शिंदे हे खामगाव येथे दिं 07/10/2021 रोजी येणार आहे.तर हा कार्यक्रम प्रेम रेसिडेंन्सी भगतसिंग चौक येथे सर्व समाज बांधवांच्या भेटी गाठी घेत त्यांच्या समस्या जाणुन घेणार आहेत.या कार्यक्रमानंतर सर्व गुरव समाज बांधवांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
सुधाकर खराटे प्रदेशाध्यक्ष,विजय तपाडकर मानद अध्यक्ष ,सुभाषअण्णा शिंदे प्रदेश मुख्य सरचिटणिस,दिलीप पुसदकर कार्यकारी अध्यक्ष हे यावेळी प्रमुख अतिथी म्हणुन ऊपस्थित राहणार आहेत.तरी खामगाव परिसरातील सर्व गुरव समाज बांधवांनी आवर्जुन ऊपस्थित रहावे असे आव्हान खामगाव येथिल अशोक आगरकर,गजानन आळेकर,संजय पारखेडकर ,प्रशांत मेंढुरकर यांचे सह सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.