?बंदर कोल ब्लॉक ला प्रक्रियेतून रद्द करण्यासाठी पर्यावरण प्रेमींनी दिले निवेदन?

    56
    Advertisements

    चिमुर (पुरोगामी संदेश नेटवर्क)

    चिमुर(दि:-24 जुन) ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या बंदर कॉल ब्लॉक लिलाव प्रक्रिया रद्द करण्यासाठी पंतप्रधान केंद्रीय पर्यावरण मंत्री मुख्यमंत्री व राज्य प्रयावरण मंत्री यांना उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फतचिमूर तालुक्यात काम करणाऱ्या पर्यावरण संस्थेनी निवेदन दिले ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या उत्तरेला बंदर कोल ब्लॉक आहे हा बंदर कॉल ब्लॉक लिलाव करण्यासाठी केंद्राने लिलाव प्रक्रियेत समाविष्ट केलेला आहे बंदर कॉल ब्लॉक मधील बंदर शेगाव अमरपुरी मजरा वडगाव हा परिसर येत असून या परिसरात वाघ व इतर वन्य प्राण्यांचे वास्तव्य आहे तसेच मेळघाट व बोर अभयारण्य अभयारण्य जोडणारा वन्यप्राण्यांचा भ्रमंती मार्ग म्हणून ओळखला जातो याच मार्गावर कोलमाईन्स झाली तर सर्व वन्यप्राण्यांच्या भ्रमण मार्ग बंद होणार त्यामुळे वन्यप्राणी हे गावाकडे कूच करतील व मानव व वन्यजीव संघर्ष वाढेल यात मानव व वन्य प्राण्यांचा प्राण धोक्यात येण्याची शक्यता आहे याशिवाय प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होईल येथील शेत जमिनीची पोत उत्पादन क्षमता सुद्धा कमी होणार आहे म्हणून या कोलब्लॉक ला विरोध करीत असल्याचे पर्यावरणवाद्यांचे म्हणणे असून लिलाव प्रक्रियेतून रद्द करण्यासाठी आज पर्यावरणवाद्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले हे निवेदन तरुण पर्यावरणवादी मंडळ शंकरपुरचे सदस्य अमोद गौरकर वीरेंद्र हिंगे मोरेश्वर पांगुळ पर्यावरण संवर्धन समिती चिमूरचे कवडु लोहकरे सुशांत इंदूरकर मोहन सातपैसे समीर बंडे ताडोबा मित्र परिवारचे इमरान कुरेशी बालाजी ढाकूनकर यांनी दिलेलेआहे