शिथिलता मिळताच चंद्रपुरात ध्वनिप्रदूषणात चांगलीच वाढ

    54
    Advertisements

    चंद्रपूर :
    लॉकडाऊनमध्ये वाहतूक बंद असल्याने प्रदूषण झपाट्याने कमी झाले होते. मात्र प्रशासनाने शिथिलता देताच वाहनांद्वारे चंद्रपुरात ध्वनिप्रदूषणात चांगलीच वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
    जिल्ह्यात अनेक उद्योग आहेत. उद्योगांसोबत लोकसंख्या आणि वाहनांची संख्याही वाढली. उद्योगातील स्फोटके व सायरणचा आवाजही वाढला. त्यामुळे आवाजाचा त्रासही वाढला आहे. आता हा त्रास ध्वनिप्रदूषण म्हणून समोर येत आहे. अनेकदा या वाहतुकीमुळे व त्यांच्या हॉर्णमुळे नागरिकांना झोप लागत नाही. यावर आळा घालणे गरजेचे आहे. ध्वनिप्रदूषण अधिनियम २000 नुसार आवाजाबाबत अनेक नियम लागू करण्यात आले आहे. मात्र हे नियम कधी कुणी जाणून घेण्याच्या प्रयत्न केला नाही. उलट ते पायदळी तुडविले जातात. आधीच जिल्हावासियांचे जीवनमान जल व वायू प्रदूषणाने कमी करून टाकले आहे. आता ध्वनिप्रदूषणाची भर पडत आहे.