करोनामुळे वाढले दर; नाभिक समाजाचा निर्णय

    61
    Advertisements

    नागपूर :
    करोनापासून बचाव करण्यासाठी सलूनचालकाला सुरक्षेसाठी विविध उपाययोजना कराव्या लागणार आहेत. मास्क, सॅनिटायजर, मोजक्याच कर्मचा èयांमध्ये काम अशा उपाय योजनांमुळे खर्चात वाढ झाली असल्याने रविवारपासून सलून च्या दरातही वाढ करण्याचा निर्णय महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या बैठकीत शुक्रवारी घेण्यात आला.
    राज्य सरकारने रविवारपासून सलून सुरू करण्याला परवानगी दिली. मात्र, केवळ केशकर्तना साठी आणि हेअरडायसाठीच ही परवानगी आहे. या सेवा देताना काय काय उपाययोनजा कराव्या लागतील, याबाबत महाराष्ट्र नाभिक महामंडळाची बैठक झाली. सेंटड्ढल एव्हेन्यूवरील नगाजी महाराज मठ येथे घेण्यात आलेल्या बैठकीला विदर्भ विभाग अध्यक्ष श्याम आस्कर कर, संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष अंबादास पाटील, उपाध्यक्ष बंडू राऊत, जिल्हाध्यक्ष गणपत चौधरी, कार्याध्यक्ष विष्णू इजन कर, राजेंद्र फुलबांधे, सरचिटणीस राजेंद्र इंगळे, सुरेश अतकरे आदी उपस्थित होते.
    करोनापासून कसा बचाव करायचा, याबाबत सलूनचालकांना प्रशिक्षणही देण्यात आले.
    आर्थिक पॅकेज द्या, अन्यथा आंदोलन
    केशकर्तनालय सलून कारागिरांच्या युवा संघटनेचीही शुक्रवारी बैठक झाली. जिल्हाध्यक्ष सतीश तलवारकर यांच्या अध्यक्षतेखीली घेण्यात आलेल्या या बैठकीला सुरेश चौधरी, विजय वाटकर, रमेश चौधरी, जिल्हा महिलाध्यक्ष मनीषा पापडकर, युवा संघटनेचे अध्यक्ष अमोल तळखंडे, तानाजी कडवे, सतीश फोफसे, प्रवीण चौधरी आदी उपस्थित होते. महाराष्ट्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे लॉकडाउनच्या काळात राज्यातील आठ सलून कारागिरांचा बळी गेला असल्याची खंत यावेळी व्यक्त करण्यात आली. रविवारपासून केवळ केशकर्तनासाठी सलून सुरू करण्यात येत आहे. केवळ सलून सुरू करूनच उपयोग नाही तर गेल्या चार महिन्यांत झालेले नुकसान भरून निघावे, अशी अपेक्षा या बैठकीत व्यक्त करण्यात आली. बळी गेलेल्या कारागिरांच्या कुटुंबाला १० लाखांची आर्थिक मदत द्यावी, वारसांना सरकारी नोकरी द्यावी, सलून कारागिरांसाठी आर्थिक पॅकेज जाहीर करावे, आदी मागण्या या बैठकीत करण्यात आल्या. ५ जुलैपर्यंत आर्थिक पॅकेज जाहीर केले नाही तर आंदोलनाचा इशाराही समाजबांधवांनी दिला.