?आंबोली ग्रामपंचायत सचिवा मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन
✒️चिमुर(पुरोगामी संदेश नेटवर्क)
(चिमुर दि:-27)कोरोना महामारी चा संकट काळात ग्रामीन भागातील शेेतकरी, शेेेतमजूर अडचणीत सापडले होतेे त्यामुळे जीवन जगणे कठीण झााले आहे, त्यामुुळेे वीजबिल भरणे कठीण जाणार असल्यामुळे लाँँकडाउन काळातील वीज बिल माफ करण्य्यात यावेे अशी मागणी आंबोली येेथील युुवा सामाजिक कार्यकतेे शुुुभम मंंडपे यानी केेली.
कोरोनाचा जगभर प्रादुर्भाव झाला असुन त्याच कालावधीत लॉकडाउन च्या काळात शेतकऱ्यांच्या व शेतमजुरांच्या हातात काम नाही त्यामुळे अनेक गाेर गरीब व सर्व सामान्य जनतेला मजुरीसाठी घराबाहेर पडणे कठीण झाले हाेते इतकेच नाहीतर हातावर आणून पानावर खाणारे मजूर हतबल झाले आहेत त्यातच त्यांच्या समाेर दाेन वेळच्या भाेजनाचा प्रश्न निर्माण झाला हाेता कसे बसे त्यांनी ते कठीण दिवस काढले.मजुरी नसल्यामुळे त्यांचे हातात दाेन पैसे नाही आणि आजच्या स्थितीत विद्युत मंडळाने भरमसाठ व दुप्पट तिप्पट वीज बिल पाठवुऩ त्यांचे अक्षरशा कंबरडे माेडले.या गरीबांची हाक अनेकांच्या कानावर गेली.
हाच मुद्दा व समस्या घेवून आंबोली गावातील समाजिक कार्याकते शुभम मंडपे यानी शेतकऱ्यांचा व शेतमजुरांच्या व्यथा लक्षात येता आंबोली ग्रामपंचायत सचिवा मार्फत मुख्यमंत्र्यांना वीज बिल माफ करण्याचे निवेदन पाठविण्यात आले यावेळी निवेदन देतांना शुभम मंडपे , वैभव ठाकरे, साजित गायकवाड , सतीश शेंडे व विजय वांढरे उपस्तीत होते.