दिव्यांगाची निधी खर्च न करणाऱ्यां ग्रामसेवक व प्रशासकावर फौजदारी गुन्हा नोंदवा

    45
    Advertisements

    ?प्रहार संघटनेचे रुग्णसेवक जिवन तोगरे यांची मागणी

    ✒️सय्यद शब्बीर जहागीरदार(विशेष प्रतिनिधी)

    जिवती(दि.29जून):- पचायत समिती अंतर्गत येणाऱ्या काही ग्राम पंचायत नी ज्या व्यक्तीला हात पाय नाही अपंग बांधवांची ज्या ग्रामपंचायतीने दिव्यांगांसाठीचा टक्के निधी अखर्चित ठेवला आहे. अशा ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक व प्रशासकावर फौजदारी गुन्हा नोंद करण्याची निवेदनातून मागणी प्रहार संघटनेचे रुग्णसेवक जिवन तोगरे यांनी गट विकास अधिकारी पंचायत समिती जिवती, चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.

    याबात करण्यात आलेल्या तक्रारात म्हणाले आहे की चालू वर्षातील अपंग कायद्याअंतर्गत काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ५ टक्के निधी मार्च अखेर खर्च न करणा-या ग्रामसेवक व प्रशासक यांना निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी.तसेच अशा निधी खर्च न करणा-या ग्रामसेवक व प्रशासकावर फौजदारी गुन्हा नोंद करण्याचीही करण्यात यावे तसेच येत्या १ जुलै पर्यंत निधी खर्च न झाल्यास २ जुलै ला प्रहार संघटनेच्या वतीने व अपंग बांधवांना सोबत घेऊन गट विकास अधिकारी पंचायत समिती जिवती यांच्या कार्यालयाची महापुजा करण्यात येईल अशा इशारा प्रहार संघटनेचे रुग्णसेवक जिवन तोगरे यांनी दिलेल्या आहे.