✒️जगदीश का.काशिकर(विशेष प्रतिनिधी)मो:-९७६८४२५७५७
मुंबई(दि.16जुलै):-40 वर्षीय पीडित महिलेने लैंगिक छळ आणि विनयभंगाच्या गुन्ह्यासाठी *लैंगिक छळ समितीचेच सदस्य आणि सचिव* आणि इतर 5 उच्च अधिकार्यांविरुद्ध एफआयआर नोंदविला गेला आहे, त्यापैकी एक आरोपी हे *हॅफकिन बायोफार्मास्युटिकल कॉर्पोरेशन लिमिटेड* चे अधिकारी असून त्यापैकी एक महिला आरोपी आहे. भादंविच्या 354, 354(अ), 354(डी), 341, 509, 506, 507, 34 भा. दं. वि. , एफआयआर क्र. 741/ 2022 अन्वये भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, आरोपीना अद्याप अटक करण्यात आली नाही, पीडिता या वय वर्षे 40 असून संस्थेत मॅनेजर म्हणून काम निवृत्त झाल्या.
पिडित महिला हाफकीन महामंडळ परेल येथे कामाला होती तेथील काही वरिष्ठ अधिकारी तसेच युनियन लीडर यांनी लैंगिक शारीरिक व मानसिक अत्याचार केले होते. म्हणून त्यानि त्यांच्या विरुद्ध हाफकिन महामंडळातील सुप्रीम कोर्टाच्या आदेशा प्रमाणे स्थापन झालेली महिला लैंगिक अत्याचार समिती (विशाखा कमिटी) यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करण्यास गेली असता त्यांनी ती तक्रार घेण्यास नकार दिला त्यामुुळे त्यानंतर त्येनि भोईवाडा पोलीस स्टेशनला जाऊन संबंधित रीतसर तक्रार नोंदविली. पोलीस स्टेशनमधील अधिकाऱ्यांनी तक्रारीची नोंद घेऊन त्या सर्व व्यक्तींवर गुन्हा दाखल करून FIR याची नोंद केली आहे परंतुं त्यांच्यावर लैंगिक व शारीरिक अत्याचार करणारे श्री.अमित डोंगरे, श्री. दीपक पेडणेकर, श्री.बबन ढेकणे, श्री. सुभाष शंकरवार यांना अद्यापही अटक किंवा त्यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई झालेली नाही त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे तरी या प्रकरणात त्यांना न्याय मिळावा हिच अपेक्षा.
Haffkine बायोफार्मास्युटिकल कॉर्पोरेशन मॅन्युफॅक्चरिंग युनिट हे हाफकाइन इन्स्टिट्यूटचा एक भाग होता, ही देशातील सर्वात जुनी बायोमेडिकल संशोधन संस्था आहे. 1899 मध्ये याची स्थापना करण्यात आली आणि प्लेग लसीचा शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञ (डॉ. वाल्डेमार मॉर्डेकाई हाफकीन) यांच्या नावावरून त्याचे नाव देण्यात आले. तेव्हापासून, हाफकिन इन्स्टिट्यूट ही एक बहु-अनुशासनात्मक संस्था म्हणून उदयास आली आहे जी संसर्गजन्य रोगांच्या विविध पैलूंचे प्रशिक्षण, संशोधन आणि चाचणीमध्ये गुंतलेली आहे. बायोफार्मास्युटिकल कॉर्पोरेशन हे महामंडळ 1974 मध्ये वेगळे झाले. आता ते निमशासकीय महामंडळ आहे.