शहीद जवान प्रमोद जगन्नाथ मराठे यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणार्थ वेल्हाणे येथे त्यांच्या स्मुर्तीस अभिवादन

    56
    Advertisements

    ✒️वेल्हाणे(पुरोगामी न्युज नेटवर्क)

    वेल्हाणे(दि.15सप्टेंबर):-येथील प्रथम शहीद जवान प्रमोद जगन्नाथ मराठे यांना दिनांक 15 सप्टेंबर 2018 रोजी वीरगती प्राप्त झाली होती. ते वेल्हाणे येथील माजी ग्रामपंचायत सदस्य जगन्नाथ मराठे यांचे सुपत्र होते. आज त्यांचा चतुर्थ पुण्यस्मरणार्थ त्यांच्या पावन स्मृतीस वेल्हाणे येथे अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला.

    यावेळी शहीद जवान प्रमोद मराठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांकडून शहीद जवान अमर रहे…! प्रमोद मराठे अमर रहे…! अशा घोषणा देण्यात आल्या.

    यावेळी उपस्थित माजी ग्रामपंचायत सदस्य व शहीद जवान प्रमोद मराठे यांचे वडील जगन्नाथ मराठे, माजी सरपंच आण्णाभाऊ मराठे, माजी सदस्य गुलाब मराठे, प्रवीण मराठे, सोसायटीचे चेअरमन निलेश मराठे, रमेश मराठे, पिंटू मराठे, भिला मराठे, नेवा बापू मराठे, अर्जुन मराठे, रविंद्र कोळी, रामकृष्ण माळी, गोपीचंद जाधव, बापू जाधव, शहीद जवान प्रमोद मराठे यांचे लहान बंधू विशाल मराठे, विकास मराठे, कोमल मराठे, ज्ञानेश्वर मराठे, आबा मराठे, संदीप मराठे, भैय्या मराठे व ग्रामस्थ आणि तरुण उपस्थित होते.