✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)
चिमूर(दि.25सप्टेंबर):-स्थानिक राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजनेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कला, वाणिज्य महाविद्यालय भिसी येथील प्रा. डॉ. नथूजी गिरडे, विभागीय समन्वयक प्रा.पितांबर पिसे, महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य लेफ्टनंट डॉ. प्रफुल्ल बनसोड यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व राष्ट्रीय सेवा योजनेच्या गीतांनी झाली. याप्रसंगी मार्गदर्शनात नथुजी गिरडे म्हणाले की, शिक्षण व समाज यांना जोडणारा युवा वर्ग आहे. राष्ट्रीय स्वयंसेवकांनी समाजाच्या सर्व घटकापर्यंत त्यांच्या समस्येपर्यंत पोहोचणे ही काळाची गरज आहे. स्वयंसेवकांनी समाजसेवेचे व्रत आणि ज्योत सतत तेवत ठेवली पाहिजे.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या अंतर्गत विविध उपक्रमात सहभागी झाले पाहिजे. याप्रसंगी विभागीय समन्वयक प्रा. पितांबर पिसे यांनी आपल्या मार्गदर्शनात राष्ट्रीय सेवा योजनेचे आतापर्यंतचे कार्य व स्वयंसेवकाचे समाजाप्रती असणारे योगदान याविषयी माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात कार्यकारी प्राचार्य लेफ्टनंट डॉ. प्रफुल्ल बनसोड यांनी म्हटले की, राष्ट्रीय सेवा योजना ही एक व्यक्तिमत्त्व विकासाची संधी आहे. जो विद्यार्थी स्वतःला ओळखतो तोच उंच भरारी घेतो. स्वंयसेवकांनी समाजाप्रती असणाऱ्या ऋणची भरपाई केली पाहिजे.
याप्रंसगी महाविध्यालयातील रासेयो विभागातील सुप्रिया भोपे या स्वयंसेविकेची दिल्ली राजपथ येथील यशोगाथा विशद केली. कार्यक्रमाला मराठी विभाग प्रमुख प्रा.कार्तिक पाटील, डॉ. कामडी, डॉ.राहंगडाले, प्रा. आशुतोष पोपटे प्रा. वाकडे, राष्ट्रीय कार्यक्रमाधिकारी प्रा. प्रफुल राजुरवाडे, प्रा. डॉ कात्रोजवार उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाश बोबडे, प्रास्ताविक सुरज देशकर ,आभार प्रदर्शन साक्षिता नन्नावरे यांनी केले. या कार्यक्रमाला गांधी सेवा शिक्षण समितीचे अध्यक्ष डॉ. दीपकजी यावले व सचिव विनायक रावजी कापसे यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.