?गेवराई तालुक्यातील उमापुर गूळज येथील घटना
✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114
उमापुर(दि.27सप्टेंबर):- गेवराई तालुक्यातील उमापुर गूळज या ठिकाणी रहिवासी असणार्या 14 जणांना भगरीतून सोमवारी राञी विषबाधा झाली असुन त्याच्यांवर गेवराईच्या सरकारी व एका खाजगी रूग्णलयात उपचार सुरू आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,काल दि.२६ रोजी घटस्थापनेमुळे दिवसभर या लोकांना उपवास होता. तसेच रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान वरिल लोकांनी फराळ म्हणून भगर खाल्ली होती.त्यातूनच त्यांना विषबाधा झाली तसेच मळमळ , उलटी,हातपाय थरथर कापणे असे लक्षणे आढळून आली असल्याने विलंब न करता त्यांच्यावर गेवराईच्या एका खाजगी रूग्णलयात उपचार सुरू आहेत.व त्यांची प्रकृती ही समाधान कारक असल्याची माहिती आहे.दरम्यान हे दहा लोक वेगवेगळ्या कुटूंबियातील असुन महिला व पुरूष व अशा दोन्हींचा या दहाजणांमध्ये समावेश आहे.