कामगार नेते स्तंभ लेखक सागर तायडे यांचा जीवन संघर्ष

    83
    Advertisements

    असंघटीत कष्टकरी कामगार,मजूर,शेतमजूर मोठ्या संख्येने इतर पक्ष संघटने कडे वळतो आहे.याचा सर्वच जागृत कार्यकर्ता,बुद्धीजीवी,साहित्यिकांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे.तो त्यांनी केला नसल्यामुळेच रिपब्लिकन पक्षाची विचारधारा किती हि चांगली असली तरी तिचे आचरण करणारे अनुयायी नसल्यामुळे रिपब्लिकन पक्षाचे अंतिम उद्धिष्ट गाठू शकला नाही. त्या रिपब्लिकन पक्षाचा वर्धापन दिवस ३ ऑक्टोबर आहे. आणि असंघटीत कष्टकरी नाका कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणारे कामगार नेते सागर तायडे यांचा जन्म ही ३ ऑक्टोबरच आहे.त्यामुळेच ही दिनांक डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारांशी खूप जुळणारी आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण गाडेगाव खुर्द,माध्यमिक शिक्षण सुनगांव,तालुका जळगाव,(जामोद) जिल्हा बुलढाणा या ठिकाणी झाले. पुढे त्यांनी मुंबई या ठिकाणी शिक्षण घेतले. असंघटीत कष्टकरी नाका कामगारांच्या न्याय हक्कासाठी त्यांच्या समस्या मांडण्याचे काम सुरु केले त्यांना ते लिहण्यासाठी प्रोत्साहन विजय सातपुते आणि शरद पाटील यांनी दिले, त्यामुळे त्यांनी अनेक समस्यावर लिहायला सुरुवात केली.ती आज ही मोठ्या प्रमाणात सुरु आहे. त्यांचा पहिला लेख अब्राम्हणी सत्यशोधक मासिकाला पाठविला आणि त्यात तो छापुन देखील आला. तेव्हा त्यांना बरे वाटले. खर तर कोणत्याही नवीन लेखकाला आपला लेख छापुन आल्यावर अतिशय आनंद होतो. तसा सागर तायडे यांना पण झाला.

    तायडे हे टाटा पॉवर कंपनीत नोकरी करत होते. पण ते ग्रामीण भागातील आल्याने त्यांना असंघटीत कष्टकरी कामगारां बद्दल आस्था होती. त्यामुळे त्यांनी आजूबाजूला चालत असलेल्या घडामोडींचा समस्याचा जवळून अभ्यास केला. आणि त्यावर लिहायला सुरवात केली.मग त्यांच्या लिखाणात गरिबांच्या व्यथा,सामाजिक प्रश्न, समस्या आणि राजकीय परिस्थिती या संदर्भात विश्लेषण करणारे लेख बातम्या प्रसिद्ध होत असत. धार्मिक,सामाजिक,शैक्षणिक आरोग्याबाबत सातत्याने लिहायला सुरुवात केली ते सत्य परिस्थितीवर पोटतिडकीने लिहीत असल्याने आणि वास्तवदर्शी असल्याने त्यांचे लेख साप्ताहिक, दैनिक मध्ये नियमितपणे प्रसिद्ध होत होते.आणि आज ही होत असतात.

    कामगार नेते स्तंभ लेखक सागर तायडेचा जीवन संघर्ष त्यांच्या कौटुंबिक जीवन संघर्षा संदर्भात बाबत जर विचार केला. तर नक्की लक्षात येईल की त्यांची पत्नी ही चंद्रकला सागर तायडे ही अतिशय प्रेमळ असून, गरिबीची जाण असणारी आणि सुख दुःख समजून घेणारी होती. तिचा अलीकडेच २७ सप्टेंबर २०२१ रोजी ५९ वा वाढदिवस होता. आईच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचा मुलगा प्रशांत सागर तायडे यांचा लेख वाचला त्यात ते आई आणि बाबा संदर्भात एक प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व असल्याचे सांगतात. महिला मध्ये म्हणजे चांगली महिला म्हणून पाच गुण असायला हवे ते सारे म्हणजे माझी आई चंद्रकला सागर तायडे यांच्या पत्नीत असल्याचा उल्लेख करतात. खर तर त्यांच्या पत्नी मध्ये सामंजस्य पणा आहे,ती प्रेमळ आहे, सुख दुःखात सहभागी होऊन पुढे चालणारी आहे. आपल्या कडील नातेवाईक असेल या तर पती कडील सर्वांना समान वागणूक देणारी आहे. त्यामुळे सागर तायडे हे आपल्या घरा बाबतीत निश्चित राहतात. ते सत्यशोधक कामगार संघटनेचे संस्थापक सदस्य आहेत. आता ते महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आहेत. त्याच बरोबर ते स्वतंत्र मजदूर युनियनचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत. विशेष म्हणजे ते स्तंभलेखक असून संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचे तीस पेक्षा जास्त दैनिकात लेख नियमितपणे प्रसिद्ध होत असतात.

    त्यांचे लिखाण हे सामान्य लोकांच्या हितासाठी असते. म्हणून त्यांच्या लिखाणाला दैनिकात प्राधान्य दिले जाते. ते टाटा पावर कंपनी मध्ये नोकरीला होते. ३ ऑक्टोबर त्यांचा वाढदिवस असतो. ३० ऑक्टोबर २०२१ ला ते सेवानिवृत्त झाले. त्यांचा वाढदिवस हा तीन ऑक्टोबर रोजी आहे. ज्या दिवशी रिपब्लिकन पक्षाचा वर्धापन दिवस ही असतो. खर तर त्यांचे लिखाण हेच नेहमी आत्मचिंतन व परीक्षण करणारे रिपब्लिकन जनतेसाठी हिताच्या दृष्टीने योग्य असे असते. भारतीय समाज किती समजून घेतो त्यावर सारे अवलंबून आहे. त्यांचे दोन पुस्तके गेल्या वर्षी प्रकाशित झाले आहेत.1) क्रांतिकारी विचारांच्या सागर लाटा 2) आरक्षण लाभार्थींनी शासनकर्ती जमात बनावे. आणि पुढील काळातपण त्यांची दोन तीन पुस्तके निघतील एवढे प्रचंड प्रमाणात त्यांचे लिखाण आहे. त्यांचा वाढ दिवस हा तीन ऑक्टोबर आहे.एकसट वर्षे पूर्ण होऊन ते बासटव्या वर्षात पदार्पण करीत आहे. त्यांचा अनुभव आणि ज्ञानात प्रचंड प्रमाणात वाढ होत आहे. कामगार नेते स्तंभ लेखक सागर तायडेचा जीवन संघर्ष यास्तव मी हे थोडक्यात मनोगत व्यक्त केले. २०१७ पासून आमची वैचारिक मैत्री खूप वाढली तिलाच मैत्रीभावना म्हणतात. म्हणूनच मी त्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने अविनाश टिपले जेष्ठ पत्रकार चंद्रपूर, महाराष्ट्र राज्य यांच्या कडून हार्दिक शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालीसाठी मंगल कामना करतो .

    ✒️अविनाश टिपले(जेष्ठ पत्रकार चंद्रपूर)मो:-७८७५९०९८०४