ग्रामपंचायत सदस्याच्या हत्येप्रकरणी १७ जणांवर गुन्हा; आरोपींच्या अटकेसाठी ग्रामस्थांचा ठिय्या

    48
    Advertisements

    ✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

    बीड(दि.7ऑक्टोबर):-अंबाजोगाई शहरालगत असलेल्या चनई येथे बुधवारी (दि.०५) सकाळी ग्रामपंचायत सदस्याचा रेशन दुकानदारासोबत वाद झाला.या वादाची कुरापत काढून सायंकाळी त्या ग्रामपंचायत सदस्याची तीक्ष्ण हत्याराने भोसकून हत्या करण्यात आली. याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात १७ जणांवर ॲट्राॅसिटीसह खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

    गोरखनाथ सीताराम घनघाव (वय ४९, रा. चनई) असे त्या मयत ग्राम पंचायत सदस्याचे नाव आहे. त्यांचा मुलगा रामधन यांच्या फिर्यादीनुसार, १७ जणांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. यात मनोज नवनाथ ईटकर, नवनाथ मरगु ईटकर, धीरज रमेश कदम, सुरज रमेश कदम, रमेश प्रल्हाद कदम, प्रवीण उत्तम मिसाळ, आकाश नवनाथ ईटकर, रोहित अविनाश शिनगारे, शैलेश लहू मोरे, राहुल अंकुश क्षीरसागर, सिद्धेश्वर प्रकाश पांचाळ, शरद वैजनाथ ढगे, शुभम बंडू उमाप, धर्मराज ज्ञानोबा चौरे, सुरज नारायण उमाप, गोविंद नारायण उमाप आणि दगडू आत्माराम मोरे या १७ जणांवर अंबाजोगाई शहर ठाण्यात कलम ३०२, ३२६, ३२४, १२०-ब, १४३, १४७, १४८, १४९, ५०४ आणि अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला. दरम्यान, शहर पोलिसांनी आतापर्यंत पाच आरोपींना ताब्यात घेतले आहे.

    आरोपींच्या अटकेसाठी ग्रामस्थांचा पोलीस ठाण्यात ठिय्या
    ________________

    गोरखनाथ घनघाव यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करा.या मागणीसाठी गुरुवारी दुपारी मयताच्या नातेवाईकांनी शहर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले.जो पर्यंत सर्व आरोपींना अटक होत नाही तो पर्यंत प्रेत ताब्यात घेतले जाणार नाही. अशी भूमिका मांडली.मात्र अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी सर्व नातेवाईकांची समजूत काढली. आरोपींच्या अटकेसाठी दोन स्वतंत्र पथक स्थापन करण्यात आले आहेत. ते आरोपींचा शोध घेत आहेत. तर ६ जणांना अटक करण्यात आली असल्याचे सांगून निर्माण झालेला तिढा दूर केला.या प्रकरणाचा पोलीस तपास पोलीस उपअधीक्षक स्वप्नील राठोड करीत आहेत.

    ६ जणांना १० ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी
    _______________

    चनई खुन प्रकरणातील नवनाथ मरगु ईटकर,रमेश कदम, धीरज कदम,शिवराज कदम,रोहित शिनगारे,सिद्धेश्वर पांचाळ या सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपींना जिल्हा सत्र न्यायाधीश व्ही.के.मांडे यांच्या न्यायालयासमोर हजर केले असता सहा आरोपींना दहा ऑक्टोबर पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश त्यांनी दिले.