अखिल भारतीय सफाई कामगार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष पदावर मलिक यांची निवड

    63
    Advertisements

    ✒️रोशन मदनकर(उप संपादक)

    चंद्रपूर(दि.15ऑक्टोबर):- चंद्रपूर जिल्ह्यातील कार्यरत शासकीय- निमशासकीय विभागात व नगरपरिषद – नगर पालिका- नगर पंचायत व चंद्रपूर शहर महानगरपालिका इत्यादी विभागात व कार्यालय स्तरावर चंद्रपूर जिल्ह्यातील वाल्मिकी, सुदर्शन, व मेहकर समाजात समावेश असलेल्या समाजाच्या तसेच अनुसूचित जातीतील सफाई कर्मचाऱ्यांची समस्या प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असल्याचे चित्र सध्या दिसून येत असल्याने जिल्ह्याची सदर परिस्थिती पाहता अखिल भारतीय सफाई कामगार संघटना र. नं . ११८५ चे राष्ट्रीय अध्यक्ष विजयकुमार वाल्मिकी यांचे आदेशावरून महाराष्ट्र राज्याचे राज्य अध्यक्ष धनराज चावरिया यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील समस्त सफाई कर्मचाऱ्यांच्या न्याय व हक्कासाठी हितासाठी चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष पदावर मोहनीश पापा मलिक यांची नियुक्ती केली आहे.

    याप्रसंगी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष राजू बन्सीलाल राठोड, सुदर्शन वाल्मिकी समाजाचे आजी, माजी वरिष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश बक्सरीया, किसन मलिक, नरेश बीरिया, राजू समुद्रे, मुन्ना मलिक, कमल मोगरे, लखन सारवान, चंद्रशेखर मलिक, रमेश रगडे, त्रिलोक बीरिया, शिवलाल गौतम, दशरथ मोगरे, शाम लेदरे, राम लेदरे, रवी हजारे, राजू उसरे, सुनील उसरे, आनंद रनशूर, शेखर मलिक, सुनील नन्हेट, बहादूर हजारे, कपिल बीरिया, रुपेश हजारे, राजेश भूते, जगदीश महातव, गोकुल तांबे, राजा जीवन खोटे, प्रह्लाद हजारे, विश्वनाथ महातव, अनिल नन्हेट, उमेश नन्हेट आदी मान्यवर उपस्थित होते.

    भारतीय सुदर्शन समाज महासंघाचे समस्त कार्यकारणी व वाल्मिकी, सुदर्शन, माखियार समाज विकास संघाचे समस्त कार्यकारणी तसेच इतर युवा सामाजिक कार्यकर्ते गणेश खोटे, संतोष महातव, प्रवीण हजारे, सागर महातव, रितेश खोडे, राहुल उसरे, अमर भरत, आतिश हटवाल, राजा हजारे, शिवा सारसर, अमर दुलगज, नितीन पैसाडेली, प्रीतम मलिक, राम सावरकर, साजन सारसर, सागर महातव, कमलेश राठोड, विकी उसरे, मयूर मलिक, कुलदीप मलिक, चेतन नन्हेट, सचिन सारवान, दिनेश खोटे, आकाश शुक्ला, आकाश मलिक, रोशन उसरे, कुणाल मलिक, रोहित मलिक, निखिल बैस, आशिष बीरिया, रोमिओ बक्सरीया, शुभम बक्सरीया, हेमंत भुते, शक्ती हटवाल, पप्पू राठोड, जयदीप बीरिया, रवी उसरे, सागर चरेरे, विशाल हजारे, नितेश पैसाडेली, तसेच महादलीत परिसंघाचे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष युवराज जीवन बीरिया या सर्व समाजाचे वरिष्ठ तथा युवा बांधवाकडून तसेच विविध सामाजिक संघटनेनी मोहनीश पापा मलिक यांचे अभिनंदन केले. प्रदान करून त्यांना पुढील वाटचाली करिता भरभरून शुभेच्छा दिल्या. मोहनीश पापा मलिक यांनी शुभेच्छा दिल्या बद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले.