?तात्काळ हेक्टरी 50 हजार रुपये अनुदान जाहीर करा
✒️बीड, जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-907591314
बीड(दि.17ऑक्टोबर):-सध्या परिस्थिती पाहता गेल्या आठ ते दहा दिवसापासून बीड जिल्ह्यामध्ये सतत धार पावसाने आहाकार माजवला असून हाता तोंडाशी आलेले पिके मात्र शेतकऱ्यांच्या हातातून जाताना दिसत आहेत शेतामध्ये असलेली सोयाबीन तिच्या मात्र पावसाच्या पाण्यात बुडून अक्षरशा काड्या झाल्या आहेत आणि बोंडाच्या बाहेर फुटलेल्या कापसाच्या वाती झाल्या आहेत अशी परिस्थिती असताना आणि आणखी सतत धार पाऊस आज पर्यंत चालू आहे मात्र बळीराजा अक्षरशा मेटाकोटीला आला असून त्याच्याकडे मात्र आत्महत्याच्या पलीकडे कुठलाही पर्याय नाही त्यामुळे तात्काळ शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये अनुदान जाहीर करावे.
त्यामुळे शेतकऱ्याला गेलेला खर्च तरी निघेल आज परिस्थिती पाहता शिंदे आणि फडणवीस सरकार हे फक्त बीड जिल्ह्यामध्ये 160 शेतकरी बाधित असल्याचे दाखवत आहे हे मात्र अतिशय दुःखाचे आणि खेददायी आहे परंतु यामुळे बीड जिल्ह्यातील शेतकरी अक्षरशा त्रस्त झाला आहे आज परिस्थिती पाहता सोयाबीनच्या काड्या झाल्या कापसाच्या वाती झाल्या मायबाप सरकार शेतकरी आत्महत्या करायची वाट पाहत आहे काय असा सवाल करत शेफर्ड इंडिया इंटरनॅशनल संघटनेचे व्हाईस प्रेसिडेंट दत्ता वाकसे यांनी प्रसिद्धीस पत्रक दिला आहे.
पुढे ते म्हणाले की जगावर कुठलेही संकट आले तरी बळीराजा मात्र त्यांना अन्नधान्य पुरवण्याचे काम करतो मात्र त्याच बळीराजावर संकट आले तर मात्र त्यांच्याकडे कानाडोळा केला जातो ही अतिशय मनाला खेद देणारे गोष्ट असून परिस्थिती पाहता गेल्या दहा ते पंधरा दिवसापासून सतत धार बीड जिल्ह्यामध्ये अक्षरशा पावसाचा धुमधडाका चालू असून मात्र मायबाप सरकारने बीड जिल्ह्यामध्ये अनुदानाची यादी जाहीर करताना त्यामध्ये 160 शेतकरीच नुकसानग्रस्त असल्याचे दाखवले आहे हे मात्र बळीराजाच्या तोंडाला पाणी पुसण्यासारखे आहे.
त्यामुळे तात्काळ कृषी अधिकारी मंडळ अधिकारी तलाठी यांनी तात्काळ पंचनामे करणे गरजेचे आहे परिस्थिती पाहता शेतकऱ्यांना मात्र आता शेतामध्ये राहिल्या त्या कापसाच्या वाती आणि सोयाबीनची झालेली माती या पलीकडे आता शेतकऱ्याकडे कुठल्याही पद्धतीचे काही राहिले नसून आता मात्र बळीराजाला शिंदे आणि फडणीक सरकारकडून न्याय मिळेल अपेक्षित आहे त्यामुळे तात्काळ महाराष्ट्र सरकारने बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत जाहीर करावी अशी मागणी शेफर्ड इंडिया इंटरनॅशनल संघटनेचे व्हाईस प्रेसिडेंट दत्ता वाकसे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात केली आहे