“सांज दीपावली” संगीतमय कार्यक्रम उत्साहात संपन्न

    56
    Advertisements

    ?रिदम म्युझिक अकॅडमी, संगीत कला मंच उमरखेड यांचे सादरीकरण

    ✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

    उमरखेड(दि.27ऑक्टोंबर):- शहारामध्ये रिदम म्युझिक अकॅडमी तथा रिदम संगीत कला मंच उमरखेड यांनी आयोजित केलेला खास दिवाळीनिमित्त “सांज दीपावली” हा संगीतमय कार्यक्रम महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाच्या प्रांगणात भव्य स्वरूपात उत्साहात संपन्न झाला.

    या कार्यक्रमामध्ये प्रा. वि. ना. कदम व प्रकाश दुधेवार सर यांच्या प्रमुख व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत “दीप प्रज्वलन” करून उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

    फर्ग्युसन कॉलेज पुणे बारावी आणि सोबतच गंधर्व महाविद्यालय पुणे येथे शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेत असलेली व सांज दीपावली या कार्यक्रमा ची मुख्य गायिका कुमारी आचल संजय मुटकुळे यांनी आपल्या मधुर आवाजात दीपावली मनाई सुहानी या गाण्याने कार्यक्रमाची सुरुवात केली तसेच सौ. पुजारी मॅडम शीतल मुटकुळे कु सुप्रिया मामीडवार कु आशा वानखेडे इत्यादी गायिका आणि संजय मुटकुळे, मारुती कळणे, शिवशंकर वैद्य इत्यादी गायकांनी नवी जुनी मराठी हिंदी गीते गाऊन रसिक प्रेक्षकांची मने जिंकली ह्या कार्यक्रमा चे उत्कृष्ट संगीत नियोजन सुरेश गायकवाड हिंगोली, चेतन संजय चित्ते नांदेड, सचिन पवार, संतोष हातगावकर , राजेश जाधव, गणेश इंगोले इत्यादी कलाकारांनी केले.

    उत्कृष्ट सूत्रसंचालन :- आर. डी .शिंदे सर यांनी केले व रिदम म्युझिक अकॅडमी चे संचालक :- संजय शामराव मुटकुळे यांनी आभार प्रदर्शन केले.

    या संगीतमय कार्यक्रमाला शहरातील शिक्षक डॉक्टर व कर्मचारी व इतर नागरिक व महिला मंडळी व जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते त्यापैकी ओम प्रकाश सरडा, किशोर भंडारी, डॉ धनंजय व्यवहारे, प्रा . अमोल कवाने, काटकोजवार सर, श्री कुरवाळे सर, डॉ अमोल कोल्हे, राजेश जोशी , विनकरे सर,जाधव सर प्रा. डॉ. शिवराज शिंदे नांदेड, कानकाटे सर, मोहन वाकळे साहेब, गिरी सर, बिच्चवार सर, आणि पत्रकार बंधू डॉ.अविनाश खंदारे, श्री.सिद्धार्थ दिवेकर, सविता चंद्रे मॅडम उपस्थित होते.