?शिंदे – फडणवीस सरकारने स्थगिती दिलेली कामे पुन्हा मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार — आमदार देवेंद्र भुयार
✒️मोर्शी(पुरोगामी न्युज नेटवर्क)
मोर्शी(दि.27ऑक्टोबर):- विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात मोर्शी, वरुड, येथील उपजिल्हा रुग्णालय ईमारत बांधकाम करणे व शेंदूरजनाघाट येथील ग्रामीण रुग्णालय व कर्मचारी निवासस्थान ईमारत बांधकामासाठी सुमारे ११९ कोटी ५१ लाख ७३ हजार रुपयांची विकास कामे मंजूर करण्यात आली होती. मात्र, शिंदे-फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर मोर्शी वरुड शेघाट येथील महत्वाच्या कामांना स्थागिती मिळाल्याने विकासाला खोडा बसला आहे.
सत्तांतर झाल्यानंतर काय होऊ शकते याचा प्रत्यय आता येऊ लागला आहे. महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयावर शिंदे सरकारचे विशेष लक्ष आहे. शिंदे सरकारनं आमदार देवेंद्र भुयार यांनी मंजूर करून घेतलेल्या ११९ कोटींच्या विकास कामांना स्थगिती दिली आहे.मोर्शी वरुड तालुक्याचा विस्तार आणि वाढलेली लोकसंख्या विचारात घेता मोर्शी वरुड तालुक्यातील नागरिकांना चांगल्या वैद्यकीय सेवा शहरात उपलब्ध व्हाव्यात यासाठी आमदार देवेंद्र भुयार हे आग्रही आहे.
मोर्शी वरुड शेघाट येथील रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून ईमारत बांधकाम, कर्मचारी निवस्थान या विकास कामांच्या अंदाजपत्रक व आराखड्यांना प्रशासकीय मान्यता देण्याची मागणी आमदार देवेंद्र भुयार यांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार माजी माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केल्यामुळे आमदार देवेंद्र भुयार यांच्या मागणीची दखल घेऊन मोर्शी येथील ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय, मुख्य इमारत बांधकामा करीता ४९ कोटी २३ लक्ष रुपये, वरुड येथील ३० खतांच्या ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय नवीन मुख्य ईमारत बांधकामा करीता ५० कोटी २३ लक्ष रुपये, शेंदूरजना घाट येथील ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय ईमारत बांधकाम करणे करीता १६ कोटी ५ लक्ष रुपये, १० डिसेंबर २०२१ रोजी मंजूर करण्यात आले, शेंदूरजना घाट ग्रामीण रुग्णालय येथील कर्मचारी निवासस्थान बांधकाम करणे करीता ४ कोटी २२ लक्ष ७३ हजार रुपये १२ मे २०२२ रोजी मंजूर केले असून मोर्शी वरुड शेंदूरजनाघाट येथील आरोग्य विभागाच्या ११९ कोटी ५१ लक्ष १७ हजार ३०० रुपयांच्या प्राथमिक अंदाजपत्रक व आराखडयांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती.
मोर्शी वरुड तालुक्याला गेले अनेक वर्षे चर्चा अन् प्रतीक्षाच ठरलेल्या मोर्शी वरुड शेंदूरजना घाट येथील रुग्णालयाचे श्रेणीवर्धन नवीन ईमारत बांधकाम होण्यासाठी कंबर कसल्यामुळे मोर्शी विधानसभा मतदार संघाच्या विकासाकरिता तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून मोर्शी वरुड तालुक्याकरीता कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध झाला होता. मात्र शिंदे – फडणवीस सरकार आल्यापासून मोर्शी वरुड तालुक्यातील विकास कामांना स्थगिती दिल्यामुळे आरोग्य विभागाची विकास कामे थांबली असल्याचे आमदार देवेंद्र भुयार यांनी यावेळी सांगितले.
शिंदे, फडणवीस सरकारने स्थगिती दिलेली कामे पुन्हा मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार — आमदार देवेंद्र भुयार
‘‘शिंदे-फडणवीस सरकारने महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात मंजूर झालेल्या विकास कामांना जरी स्थगिती दिली असली तरी जनतेच्या हिताची मंजूर असलेली सर्व विकास कामे पूर्णत्वास नेण्यासाठी माझा लढा सुरू राहणार असून मंजूर झालेले सर्व विकास कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करनार,’’ — आमदार देवेंद्र भुयार .