✒️शेखर बडगे(अमरावती, जिल्हा प्रतिनिधी)मो:-9545619905
?दोन दिवसापूर्वी राज्यमंत्री बच्चू कडू हे कोलकासला येथे गेले असता त्यांनी ‘चंपाकली’ नावाच्या एका हत्तीणीला दत्तक घेऊन…. 21 हजारांचा धनादेश सुपूर्द केला.
अमरावती(दि-9जुलै):– सातत्याने वेगळं काही करून नेहमी चर्चेत राहणारे अमरावतीच्या अचलपूरचे आमदार तथा राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यावर पुन्हा एकदा कौतुकाचा वर्षाव होत आहे. कडू यांनी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या कोलकास पर्यटन स्थळातील चंपाकली नावाच्या हत्तीणीला दत्तक घेतले आहे. त्यामुळे ते चर्चेत आहेत. त्यासाठी त्यांनी २१ हजार रुपयांची निधी ही मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला आहे.
अमरावतीच्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पात एकूण पाच हत्तीण आहे. त्यापैकी एक जरीदा येथे आहे. तर अन्य चार हत्तीणीचे वास्तव हे कोलकास या पर्यटन क्षेत्रात आहे. पूर्वी या चार हत्तीणींचा वनातील लाकडे व अन्य कामांसाठी उपयोग करायचे. परंतु मेळघाटात येणाऱ्या पर्यटकांची हत्ती सफरीसाठी वाढलेली मागणी पाहून या हत्तींणीचा उपयोग हा जंगल सफरीसाठी केला जात आहे.दरम्यान, या हत्तीणींच्या खान पानाचा सर्व खर्च शासन करते. मात्र, अतिरिक्त खाद्य देण्यासाठी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. दोन दिवसापूर्वी राज्यमंत्री बच्चू कडू हे कोलकासला गेले असता त्यांनी ‘चंपाकली’ नावाच्या एका हत्तीनीला दत्तक घेऊन 21 हजारांचा धनादेश सुपूर्द केला.