“प्रेमी क्लिनिक” ४ नोव्हेंबरला प्रेम कवितांची मैफल रंगणार

    43
    Advertisements

    ✒️पुणे(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

    पुणे(दि.2नोव्हेंबर):– नक्षञाचं देणं काव्यमंच निर्मित थिएटर शो “प्रेम क्लिनिक” चे सादरीकरण उद्यान प्रसाद कार्यालय,खजिना विहिरी जवळ,सदाशिव पेठ, पुणे येथे सांय ४.४५ ला शुक्रवार दि.४ नोव्हेंबरला रंगणार आहे.

    तरुण तरुणींच्या मनावर आधिराज्य गाजवणारे कवी वादळकार यांच्या वादळी प्रेम कवितांची वादळी काव्यमैफल रंगणार आहे.

    “वाटा जरी संपल्या,
    तरी दिशा अजून बाकी आहे.
    तुझे माझे प्रेम संपले,
    तरी आठवणी ताज्या आहे.”
    तसेच

    “तुझ्या माझ्या भेटीत,
    येत असतो नेहमीच पाऊस.
    सखे साठवून ठेव,
    तुझ्या मनात माझा प्रेमाचा पाऊस.”

    अशा अनेक प्रेमाच्या वादळी कवितांची मैफल रंगणार आहे.

    हा कार्यक्रम सर्वांना विनामूल्य आहे. यावेळी प्रा.राजेंद्र सोनवणे यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त “मला भावलेले कवी वादळकार”या वाढदिवस विशेषांकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. या विशेषांकात कवी वादळकार यांच्या कार्याचा सुंगंध दरवळवणारे लेक व स्मृतींना उजाळा देणारे क्षञचिञे ही देण्यात आली आहे.

    प्रा.राजेंद्र सोनवणे यांनी नक्षञाचं देणं काव्यमंच, साई कला आविष्कार नाट्य संस्था, जुन्नर तालुका मिञ मंडळ, पुणे ,साईराजे पब्लिकेशनचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांच्या वाढदिवसाला शुभेच्छांसाठी अनेक मान्यवर मंडळी उपस्थित राहत आहे.