?एक किलोचा फरक दाखवा एक लाख रुपये बक्षीस मिळवा: मुन्नासाहेब महाडिक
✒️कुरुल प्रतिनिधी(नानासाहेब ननवरे)
कुरुल(दि.6नोव्हेंबर):-दि.५ नोव्हेंबर रोजी मोहोळ तालुक्यातील वडवळ नागनाथ महाराजांच्या पवननगरीत भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ नागनाथ महाराजांना श्रीफळ वाढवून व वडवळ येथे जाहीर सभा घेण्यात आली,या सभेला हाऊस फुल्ल गर्दी जमली होती. मोहोळ तालुक्यातील दिग्गज , चळवळीतील नेते भीमा शेतकरी विकास पॅनलच्या जाहीर सभेला उपस्थित राहिल्यामुळे मुन्ना साहेब महाडिक यांना मोठी ताकद मिळाली आहे.विजय निश्चितच आहे.
यावेळी प्रमुख मान्यवरांची भाषणे जनहितचे शेतकरी संघटनेचे प्रभाकर भैय्या देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील, ज्योती क्रांती परिषदेचे संस्थापक रमेश आप्पा बारसकर,विश्वराज महाडिक, जिल्हापरिषद व अर्थ बांधकाम सभापती विजयराज डोंगरे,प्रा.माऊली जाधव,जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब जाधव,मा.जिल्हापरिषद सदस्या शैलाताई गोडसे, मान्यवरांनी विरोधकांवरती सडकुन टिकास्त्र सोडले.कारण नसताना निवडणूक लावली,
विश्वराज महाडिक बोलताना म्हणाले कि भीमा सहकारी साखर कारखाना निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून कारखान्याचे चेअरमन तथा राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव विश्वराज महाडिक यांनी या कारखाना निवडणुकीत आपला अग्रेसर सहभाग नोंदवून ते प्रचारफेरीच्या माध्यमातून प्रत्येक गावोगावी जात शेतकरी सभासद यांच्या भेटीगाटी घेऊन त्यांना भिमा शेतकरी आघाडी पॅनलच्या सर्व उमेदवारांना मतदान करण्याचे ते आवाहन करत आहोत तसेच संस्थेविषयी विरोधाला विरोध म्हणून विरोधक खोटेनाटे आरोप करत असुन संस्थेला बदनाम करत असून लोकशाहीत निवडणुका येत असतात जात असतात परंतु ज्या कारखान्याचा आपल्याला जीवनात खारीचा वाटा आहे. त्या कारखान्यास विरोध फक्त सत्तेसाठी बदनाम करत असल्याने ते सभासदांना भेटीदरम्यान बोलताना खंत व्यक्त करत आहेत तसेच ज्या विरोधकांनी एक शेतकऱ्यांच्या मालकीचा सहकारी साखर कारखाना खाजगी करून आपल्या स्वताच्या मालकीचा केला ते आज चौकात सभा घेऊन सहकार वाचले पाहिजे अशा पद्धतीचे वक्तव्य करत आहेत यापेक्षा मोठे दुर्दैव काय असा प्रश्न विश्वराज महाडिक यांनी विरोधकांसमोर उपस्थित केला आहे.
विरोधी पॅनल मुन्नासाहेब महाडिक यांचे प्रतिउत्तर दहा वर्षात दोन वर्ष कारखाना बंद होता आणि सात वर्षात पाच वर्ष अकरावी रिक्हवरी लागलेली आहे. का चुकीच्या अफवा पसरवत आहात, पत्रकार बंधुंनो तुम्हाला पुऱ्यावासहित तुम्हाला हे दाखवतो आहे. विरोधकांनी विरोध जरुर करा परतु वाईट बोलून बदनामी कशासाठी करता . एवढ्या विश्वराज महाडिक फिरतो कधी तुमचा विरुद्ध अपशब्द वापरला.तुमचा खासगी कारखाना असुन का दर जाहीर केला नाही,तुम्ही का देऊ शकत नाही २६०० रुपये दर .आम्ही आव्हान केले तसे तुम्ही पण आव्हान करा की कुठल्याही कारखान्यावरून ऊस वजन करून आणा म्हणून.महाराष्ट्रातील पहिला कारखान्याचा चेअरमन असेल कुठल्याही काटावरुन ऊस वजन करुन आणा म्हणारा पहिला चेअरमन आहे.
—-
प्रभाकर भैय्या देशमुख यांनी दोन्हीही मालकावर जहरी टिका.ये अंदर की बात है परिचारक अपने साथ है – फडणवीसांनी दिलेल्या निरोपामुळे परिचारक सक्रिय नाहीत, दोन तीन टन कटा हाणुन कसे बाळराजे व्हायचं तुम्ही बाळराजे नाही तर शेतकर्याच काळराजे आहात.रातोरात लोकनेते खासगी करुन सभासदांच्या संपत्तीवर दरोडा टाकला,भिमा तो झाकी है और पंचायत समिती जिल्हापरिषद अभी बाकी है: उमेश पाटील
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन भिमा परिवाराचे निष्ठावंत ताटे यांनी केल. यावेळी विश्वराज महाडिक, भिमाचे उपाध्यक्ष सतिश जगताप,विनोद महाडिक, भाजपचे नेते संतोष पाटील,पवन महाडिक,शिवाजीराव गुंड, जनहितचे पद्माकर देशमुख,माजी झेडपी सदस्य शैला गोडसे, तानाजीराव गुंड, बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चरणराज चवरे,रामराव भोसले,पंडित निकम, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते छगनराव पवार, वसंतराव घाडगे, मुबिना मुलाणी, अशोक क्षीरसागर, भीमराव वसेकर, श्रीकांत शिवपूजे, जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब जाधव, प्रा.माऊली जाधव, सुरेश हावळे, शिवाजी शेंडगे,विरसेन देशमुख, कार्यक्रमाचे आभार विश्वराज महाडिक यांनी मांडले आदींसह सभासद कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.