✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100
म्हसवड(दि.6नोव्हेंबर):-म्हसवड, तालुका माण, जिल्हा सातारा येथील प्रहार जनशक्ती पक्षांच्यावतीने म्हसवड व परिसरातील पोलीस भरती आणि सर्व स्पर्धा परीक्षेचे तसेच शासकीय आणि निमशासकीय नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या मुलामुलींसाठी विनामूल्य ऑनलाईन फॉर्म भरण्याचा शुभारंभ सुविधा नेट कॅफे म्हसवड येथील प्रहारच्या कार्यालयात आज पासून उपलब्ध करून देण्यात आल्याचे माण खटाव विधानसभा क्षेत्र प्रमुख अरविंद पिसे यांनी सांगितले.
यावेळी अरविंद पिसे म्हणाले म्हसवड शहरात वारंवार लाईट जाण्याचे प्रकार घडतात त्यामुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विध्यार्थ्याना ऑनलाईन फॉर्म भरनेस अडचणी निर्माण होतात काही वेळा काही विध्यार्थ्याना लाईटच्या कारणाने फॉर्म भरनेस विलंब होतो आहे याकारणाने या ठिकाणी इन्व्हर्टरची सोय करण्यात आली आहे.
म्हसवड शहर व परिसरातील विध्यार्थ्याणी या मोफत ऑनलाईन फॉर्म भरनेच्या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने यावेळी करणेत आले.या शुभारंभ प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे माण तालुका अध्यक्ष नंदकिशोर प्रताप पवार माण खटाव विधानसभा क्षेत्र प्रमुख माननीय अरविंद पिसे साहेब प्रहार दिव्यांग संघटना माण तालुका अध्यक्ष नागेश खांडेकर सामाजिक कार्यकर्ते नाथा शिंदे किशोर नामदास सचिन खांडेकर प्रशांत चोपडे नितीन खांडेकर प्रशांत जाधव व इतर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते