मनूवाद्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी बाळासाहेब आंबेडकरांचे हात मजबूत करा- प्रशिक सम्राट

    97
    Advertisements

    ✒️बदनापूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

    बदनापूर(दि.13नोव्हेंबर):- बदनापूर तालुक्यातील वाहेगाव येथे भारतीय बौध्द महासभा शाखेच्या सर्वसाधारण बैठकीच्या कार्यक्रमात बुध्द धम्माबद्दल प्रशिक सम्राट म्हणाले की, बौद्ध धम्मात स्वत:चे महान, उच्च, उदात्त असे जे दाखविले ते प्रत्यक्षात इतर धर्मियांनी बौद्धांचे विचार चोरलेले आहे आहे.

    आज निसर्गाशी संबंधित असलेले बुद्धांचे अनेक तत्त्वज्ञान आपण आत्मसात करत आहोत. त्यापैकी जवळपास सर्व तत्त्वज्ञान बौद्ध संस्कृतीतून व बौद्ध परंपरेतूनच आलेले आहेत. अनेक अर्थपूर्ण प्रतिकं हीच या बौद्ध संस्कृतीने आम्हाला दिली आणि तीच बीजे बुद्धांनी भारतात रुजविलेली आहेत. खरे पाहता बौद्ध धर्म हाच भारतीय मातीतला पहिला आणि खरा मानवधर्म होय. हाच धर्म भारतीय संस्कृतीवरचा एकनिष्ठ आणि तर्कशुद्ध वारस आहे. बौद्ध धर्माचे चेहरे तरी किती लपवणार असा सवाल त्यांनी मानवता नष्ट करून पाहणारे व शिक्षणावर आघात घालणाऱ्या सरकारंना विचारवा का असा प्रश्न ही त्यांनी उपस्थित केला भारतीय बौद्ध महासभा शाखा ही एकमेव अशी संस्था आहे ती माणसाला शहाणे व बुद्धिमान घडवण्याचे घडवण्याची काम करते गाव तिथे शाखा उपक्रम तरुणांनी आपले हाती घेतला पाहिजे गाव तिथे शाखा हा नारा असला पाहिजे.

    पुढे ते म्हणाले की,वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रध्देय एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीचे ध्येय धोरण महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या हिताचे असून दऱ्या-खोऱ्यातून अकोला, पिंपरी चिंचवड पुणे, नांदेड येथे रेकॉर्ड ब्रेक अशा धम्म मेळाव्याच्या सभा निनादल्या होत्या. आता नाशिक येथून त्यांची तोफ धडाडणार आहे असे कळते. यातूनच महाराष्ट्राचे अनुरेणू परमवैभव उजाळेल वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या एक निष्ठेचा विजय म्हणावा लागेल आणि मनुवादी गार होऊन त्यांना त्यांची जागा दिसेल असे वक्तव्य त्यांनी व्यक्त केलं.या शाखेच्या कार्यक्रमासाठी लक्ष्मण नरवाडे यांनी अति परिश्रम घेतले आणि हा कार्यक्रम त्यांनी घडवून आणला या कार्यक्रमासाठी आजूबाजूच्या गावचे बौद्ध उपासक व उपासिका बाल बालिका मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.