सक्तीची विज वसुली बंद करा अन्यथा असहकार आंदोलन करु —विजयसिंह पंडित

    48
    Advertisements

    ?महावितरणच्या विरोधात विजयसिंह पंडितांचा गेवराईत एल्गार

    ?गेवराईत राष्ट्रवादीचे धरणे आंदोलन

    ✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

    बीड(दि.18नोव्हेंबर):-महावितरण कंपनीच्या मनमानी कारभारामुळे शेतकरी आणि विज ग्राहक त्रस्त झाले आहेत. पिकांना पाणी देण्याच्या दिवसात महावितरणकडून कृषीपंपाचे विज कनेक्शन तोडले जात आहे. ही सक्तीची वसुली बंद करा, तोडलेले विज कनेक्शन परत जोडा. सर्व मागण्यांची अंमलबजावणी केली नाही तर येणाऱ्या काळात असहकार आंदोलन करुन रस्त्यावर उतरु असा इशारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी दिला. महावितरणच्या कारभारावर संताप व्यक्त करत विजयसिंह पंडित यांनी शेतकऱ्यांसह आंदोलन करताना ते बोलत होते.

    शेतकऱ्यांच्या मागण्यांच्या संदर्भात विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली गेवराई राष्ट्रवादीच्यावतीने शुक्रवार, दि.१८ रोजी सकाळी ११ वाजता महावितरण कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

    यावेळी बोलताना विजयसिंह पंडित म्हणाले की, विजवितरण कंपनीचा मनमानी कारभार चालू आहे, त्याचा निषेध करण्यासाठी हे शेतकऱ्यांचे अंदोलन आहे. शेतकऱ्यांचा हा गंभीर प्रश्न आहे. वीजतोडणीचा धडाका लावला आहे त्यामुळे शेतकरी संतापलेला आहे. कांदा लावलाय पण पाणी द्यायला लाईट नाही. राज्याचा कृषी मंत्री दळभद्री भेटला आहे. असे लोक सत्तेत बसल्या मुळे शेतकरी नाडला आहे. शेतकऱ्यांचे त्यांना कसलेही देणेघेणे नाही. यशवंतराव चव्हाण, शरदचंद्रजी पवार साहेबां सारखे मुख्यमंत्री या राज्याला भेटले त्यांनी महाराष्ट्राचे कल्याण केले पण विद्यमान मुख्यमंत्री वेगळ्याच अविर्भावात आहेत. महावितरणने कारभारात सुधारणा केली नाही तर महावितरणच्या विरोधात असहकार धोरण राबवले जाईल. विज तोडणी तात्काळ बंद करा‌. आठ तास विज मिळाली पाहिजे. लाईट दहा दहा वेळेस बंद पडते.

    तुम्ही हक्काने बील मागता मग लाईट का रेग्युलर देत नाहीत असा प्रश्न उपस्थित केला. माझा इंगा तुम्हाला माहित नाही मी नुसते कागद काळे करत नाही तर मी तुमचे तोंड देखील काळे करील. शेतकरी आज अडचणीत आहे. विमा नाही, नुकसान भरपाई नाही. अशा परिस्थितीत तुमचे वागणे चुकीचे आहे. निवडणूक आली म्हणून आम्ही आंदोलन करतोत हे डोक्यातून काढून टाका. तुमचे काम व्यवस्थित करा. मुजोरी थांबवा, सहन केली जाणार नाही.पुढील काळात या मागण्या मान्य करा अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करु. लवकरात लवकर अंमलबजावणी करा. हे आंदोलन संपलेले नाही असेही ते म्हणाले.

    यावेळी कृषीपंपाची विज तोडणी रद्द करा,
    दिवसा सुरु असलेले भारनियमन बंद करा,
    सक्तीची सुलतानी वसुली थांबवा,
    तोडलेले विज कनेक्शन तात्काळ जोडून द्या,
    नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर तीन दिवसात दुरुस्त करून द्या अशा विविध मागण्यांचे निवेदन महावितरणचे अभियंता कापुरे यांना दिले. यांना विजयसिंह पंडित यांच्या हस्ते देण्यात आले.

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयभवानीचे संचालक श्रीराम आरगडे यांनी केले. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी खाऊन खाऊन पन्नास खोके..माजलेत बोके..माजलेत बोके अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला.यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, माजी सभापती कुमारराव ढाकणे, जि.प. सदस्य फुलचंद बोरकर, श्रीराम आरगडे, पं.स. सदस्य जयसिंग जाधव, राष्ट्रवादी युवक चे अध्यक्ष ऋषिकेश बेदरे, अशोक शिंदे, राहुल जाधव, कल्याण चव्हाण, भाऊसाहेब माखले, राम शिंदे, गजानन काळे यांनी आपल्या भाषणात महावितरणच्या कारभाराचे वाभाडे काढले.

    यावेळी बाजार समितीचे सभापती जगनपाटील काळे, जयभवानीचे व्हाईस चेअरमन जगन्नाथ शिंदे, खरेदीविक्री संघाचे अध्यक्ष संग्राम आहेर, जिल्हा परिषद सदस्य फुलचंद बोरकर, माजी सभापती बाबुराव जाधव, बाळासाहेब मस्के, कुमारराव ढाकणे, भरतराव खरात, बबनराव मुळे, अप्पासाहेब गव्हाणे, पाटीलबा मस्के, बप्पासाहेब मोटे, मोहम्मद गौस, उपसभापती शाम मुळे, नंदकुमार गोर्डे, परिक्षित जाधव, सुभाष मस्के, बळीराम खरात, अण्णा गवारे, डॉ.विजयकुमार घाडगे, पांडुरंग कोळेकर, संभाजी पवळ, राजेंद्र वारंगे, विकास सानप, शाम येवले, दिपक आतकर, दत्ता दाभाडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोट्या संख्येने उपस्थित होत
    *====चौकट====*
    महावितरणला सहकार्य करा असे अभियंता कापुरे यांनी सांगताच विजयसिंह पंडित यांनी त्यांना निवेदनाची अंमलबजावणी करा. वसुलीची सक्ती करु नका. तोडणी केलेली लाईट जोडून द्या नाहीतर आम्ही असहकार आंदोलन करु असा इशाराही दिला.