सारजाई कुडे व बालकवी ठोंबरे विद्यालयात तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा उत्साहात संपन्न!…

    50
    Advertisements

    ✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

    धरणगाव(दि.19नोव्हेंबर):- जळगाव जिल्हा क्रीडा विभाग व धरणगाव पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या वतीने सारजाई कुडे व बालकवी ठोंबरे विद्यालयात शालेय विद्यार्थ्यांच्या कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते संस्थेचे अध्यक्ष हेमलालशेठ भाटीया यांच्याहस्ते हनुमानाच्या प्रतिमेचे पूजन व आखाड्याचे पूजन करून स्पर्धेला प्रारंभ करण्यात आले.

    याप्रसंगी माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक एस.एस.पाटील, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक जीवन पाटील यांनी हेमलालशेठ भाटीया यांचे स्वागत गुलाबपुष्प देऊन केले. तसेच शाळेतील क्रीडाशिक्षक तथा तालुका क्रीडा समन्वयक एस.एल.सूर्यवंशी व क्रीडाशिक्षक कैलास माळी यांनी तालुक्यातील क्रीडाशिक्षक एम.डी.परदेशी, डी.एन. पाटील, के.एस.पाटील, एच.डी.माळी, जितेंद्र ओस्तवाल, फिलिफ्स गावित, ज्ञानेश्वर पवार, तसेच पंच किशोर महाजन, आबा धनगर, विनोद महाजन व गोरख महाजन यांचे पुष्प देऊन स्वागत केले.

    कार्यक्रमाचे सूत्रसंचलन परमेश्वर रोकडे यांनी केले. ए एच पाटील, ए डी पाटील व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.आभार कैलास माळी यांनी मानले