बॉयफ्रेन्ड जेव्हा हजबन्ड होतो……नंतरचा हा राग?

    55
    Advertisements

    आफताब पूनावाला याने श्रद्धा वालकर हिची दिल्ली ला नेऊन हत्या केली.लिव्ह इन पार्टनरशिप मध्ये राहत होते. या प्रकरणाने देशभरात खळबळ उडवून दिली आहे. एकूण पोलीस यंत्रणा, वृत्तवाहिन्या आणि वृतपत्र त्यांची कर्तव्य दक्षता दाखवून सेकंद सेकंदाची बातमी देत आहे. त्याला हिंदू मुस्लीम लव्ह जिहाद दाखवून देशातील मुख्य समस्या असलेल्याचे चित्र निर्माण करीत आहे. महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, शिक्षण, आरोग्य खासगीकरणामुळे होणारे परिणाम यांची सादी दखल घेतल्या जात नाही. असो.

    अल्पवयीन मुलामुलीत वाढत चालले लैंगिक आकर्षण जीवघेणे ठरत आहे. सातवी आठवी वर्गात असतांना मुलाला गर्ल्स फ्रेंड्स आणि मुलीला बॉय फ्रेंड्स पाहिजे त्याशिवाय त्याची मित्रात वेगळी ओळख राहत नाही. मोबाईल इंटरनेट वापरून आणि सिनेमा पाहून अल्पवयीन मुलामुलीवर गंभीर परिणाम होत आहेत. असे सहज बोलले जाते. त्यातूनच मुलीचे अपहरण खून असे गुन्हे घडले जातात. मुलामुलींना आईवडील किंवा आजूबाजूच्या वडिलधाऱ्याचा कोणता ही धाक न राहिल्यामुळे अल्पवयीन मुलामुलीचे लैंगिक चाळे सैराट पणे वाढत चालले आहेत. आजच्या तरुणांनी प्रथम शिक्षणावर भर द्यावा. आईबापाचे जुने संस्कार विसरू नये. विज्ञान किती ही प्रगती करीत असले तर ते हे नियामचे काटेकोरपणे पालन करूनच पुढे जाते. न केल्यास अपघात होत असतात. किंवा असे गुन्हे घडतात ते लक्षवेधी ठरतात. त्यासाठी ही कथा सगळ्यांनी आवर्जून अवश्य वाचा.
    बाबांनी खूप अडचणी असताना त्या काळात लग्न केलंत. गेली छत्तीस वर्षं संसार केलात.

    आमच्या पिढीला का गं जमत नाही हे? तिशीची लेक हातातला फोन टेबलवर आपटत म्हणाली. चार वर्षं मज्जेत बॉयफ्रेन्ड असलेल्याचा आठ महिन्यापुर्वी हजबन्ड झाल्यानंतरचा हा राग होता. “प्रश्न विचारलास,का? पंचावन्नची आई त्या फोनला पडलेल्या चऱ्यांकडे पाहत शांत आवाजात म्हणाली” उत्तर हवंय, का? ‘हो “उत्तर हवंय”, लेक म्हणाली. “असे आहे न बाळा,” आई सहजच म्हणाली,”आम्ही ‘कसं जमवता येईल’ ते शोधत होतो.

    तुम्ही ‘जमलं तर पाहू’ म्हणताय. “आमच्या वेळी प्रेम हे “व्हायचं” तुमच्या काळात ते “केलं” जातं.”आम्ही ‘साथीदार’ व्हायचो, तुम्ही ‘पार्टनर, बनवता. “आमच्यात प्रेम ही ‘सहजता’ होती. तुमच्यात तो ‘अट्टहास’ झालाय.”आमचं प्रेम लहानाचं मोठं व्हायचं, तुमचं प्रेम लहानपणीच घाई करतं. “आमच्या वेळी “मैत्री विश्वासात” रुपांतरीत व्हायची; तुम्ही जवळिकीला रिलेशनशिपचा बोर्ड लटकवण्याची घाई करताय.”आम्ही कविता ‘लिहायचो’ तुम्ही त्या ‘फॉरवर्ड’ करताय.”आमचे “जीवनसाथी” होते, तुमचे “बॉयफ्रेन्ड” नि “गर्लफ्रेन्ड” आहेत.”आमचं प्रेम आमच्यासाठी होतं; तुमचं प्रेम ‘सगळ्या फ्रेन्ड्सचा बॉयफ्रेन्ड आहे, मग माझाही असलाच पाहीजे’, म्हणून केलं जातंय.

    “आमचे बॉयफ्रेन्ड नव्हते; कारण जो आहे तो फ्रेन्ड असण्याच्या खूप पुढे गेलाय, हे आम्हाला स्पष्ट जाणवायचं. तुमच्यात इन्स्टाग्रामवर अकाउंट असलंच पाहीजे तसा बॉयफ्रेन्डही असलाच पाहीजे, “आम्ही गिफ्ट नव्हे तर स्वत:लाच समर्पित करायचो; तुमच्या गळाभेटीतही भेट कितीची आणली असेल याची “कैलक्युलेशन्स” असतात.
    आम्ही धुंद होतो; तुम्ही उधळलेले आहात.आम्ही चेहऱ्यावरचं तेज शोधायचो; तुम्ही शर्टचा ब्रान्ड पाहताय. आम्हाला नजरेतली समजदार चमक भाळायची; तुम्हाला गॉगलच्या किमती भुरळ घालतायत.आमच्या शरीरांना पेशन्स मंजूर होता.तुमच्या मनालाच तो नकोय.

    बाळा जमणं- न जमणं हे क्षमतेवर अवलंबून असतं. क्षमता डेव्हलप करायची असते..!. जगता आलं पाहिजे. मरता केव्हाही येतं,पण जगता आलं पाहिजे. सुख भोगता केव्हाही येतं, पण दुःख पचवता आलं पाहिजे. रंग सावळा म्हणून काय झालं,कर्तृव उजाळता आलं पाहिजे. रंग गोरा असला म्हणून काय झालं, मनावरील काजळी काढता आली पाहिजे. यशानं माणूस उंच जातो पाय जमिनीवर ठेवता आलं पाहिजे. मिळालेल्या यशात समाधान मानून आनंदी जीवन जगता आलं पाहिजे. पापं काय कसही करता येतं, पण पुण्य करता आलं पाहिजे.ताठ काय कोणीही राहतं,पण जरा झुकून वागता आलं पाहिजे. ठेच जीवनात लागतेच, सहन करता आली पाहिजे. मलमपट्टी करून तिला,पुन्हा चालता आलं पाहिजे.शहाण्याचं सोंग घेऊन,वेड होता आलं पाहिजे.कशाला बळी न पडता,आनंदी जगता आलं पाहिजे.जगण्याच्या लढाईत उणीव कायम भासेल,ती उणीव भरता आली पाहिजे.हास्य आणि अश्रूचा मिलाप करून. फक्त समाधानी राहता आलं पाहिजे.आयुष्य खूप सुंदर आहे भरभरून जगता आले पाहिजे.लेखक कोण आहेत, हे माहीत नाही पण जे काही लिहिले आहे ते आजच्या पिढीला डोळ्यात अंजन घालणारे आहे.
    संकलन

    ✒️सागर रामभाऊ तायडे(मो:-९९२०४०३८५९)

    जगातील सर्व धार्मिक ग्रंथांचा गुरु- महागुरु!