✒️रोशन मदनकर(उप संपादक)
ब्रम्हपुरी(दि. 1 डिसेंबर):-एड्स हा दुर्धर आजार आहे. या रोगावर अजून पर्यंत औषध उपलब्ध नाही. हा रोग रक्तसंक्रमनातून पसरत असतो . त्यामुळे हा रोग कसा पसरतो व लक्षणे काय आहेत हे आजच्या तरूण पिढीनी समजून घेणे आवश्यक आहे. कौमार्यवस्था ही फार धोक्याची अवस्था असतें या वयात अनेक युवा तरूण या रोगाचे बळी पडतात तेव्हा HIV व्हायरसला समजून घेताना त्याचे गांभिर्य लक्षात घेतले पाहिजे. आणि हा रोग समाजात आपल्याला झाला नाही पाहिजे याकरिता एकमेव उपाय म्हणजे प्रतिबंधक हाच होय.
असे जागतिक एड्स दिवस दिनानिमित्त आयोजित केलेल्या राष्ट्रीय सेवा योजना यांच्या वतीने कार्यक्रमात अध्यक्षीय मार्गदर्शनातून प्राचार्य डॉ डी एच गहाणे यांनी विचार व्यक्त केले. यावेळी डॉ शुभाष सेकोकर , डॉ आर के डांगे , डॉ प्रकाश वट्टी, प्रा. अभिमन्यू पवार व डॉ विवेक नागभिडकर हे उपस्थित होते. याप्रसंगी डॉ शुभाष सेकोकर यांनी तरुणानी ह्या दुर्धर आजाराला समजून आपल्या राहणीमान जपलं पाहिजे हा देश तरुणांच्या खांद्यावर उभा आहे. तेव्हा देशाच्या प्रगतीसाठी एकत्र येणे गरजेचे आहे. असे मत डॉ शेकोकर यांनी मांडले. डॉ डांगे यांनी हा रोग कसा होतो ते पटवून देवून त्यांच्या गंभीरतेची काळची आवश्यक आहे.असे म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ विवेक नागभिडकर यांनी केले तर प्रास्ताविक डॉ प्रकाश वट्टी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रासेयो स्वयंसेवक गणेश धंजूळे , रोहित सहारे, कुणाल नैताम, रूचिता येलमुले, मयुरी ठेंगरी, श्रुती करंडे, मिनाक्षी गुरनुले, अर्चना बोरघरे, राणी गेटकर, गायत्री मदनकर व माजी रासेयो स्वयंसेवक सुरज के. मेश्राम यांनी अथक परिश्रम घेतले.