डिसेंबर रोजी जागतिक दिव्यांग दिन व समता पर्वचे आयोजन*

    77
    Advertisements

    ✒️खामगाव(पुरोगामी न्युज नेटवर्क)

    खामगाव(दि.2डिसेंबर):- जागतिक दिव्यांग दिवसाचे आयोजन 03 डिसेंबर तर 26 नोव्हेबर संविधान दिन ते 06डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमीत्य समता पर्व साजरा करण्यासाठी विराट मल्टीपर्पज फाऊन्डेशन खामगाव च्यावतिने दिव्यांग मेळाव्याचे आयोजन 03 डिसेंबर 2022 ला दिव्यांगासाठी विविध कार्यक्रम ज्यामध्ये Alimco csc.in. च्या माध्यमातुन दिव्यांग बांधवांना मिळणार्‍या सुविधा, आरोग्य विषयक तज्ञ वैद्यकिय क्षेत्रातिल मान्यवर यांचे कडुन माहिती तसेच संविधान विषयक माहिती,भारतरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन विषयक माहिती या माध्यमातुन विविध मान्यवर यांचे मार्गदर्शनाखाली देण्यात येणार आहे.

    तसेच नुकताच महाराष्ट्र सरकारने भारत देशातिल पहिले स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय स्थापन केल्याने यामुळे दिव्यांगांना काय फायदे होतिल याविषयी चर्चासत्र होणार आहे तरी या कार्यक्रमाला संपुर्ण दिव्यांग व दिव्यांग विषयी आस्था असणार्‍यांनी या कार्यक्रमाला पत्रकार भवन ग्रामिण पोलिस स्टेशन जवळ खामगाव जि.बूलढाणा येथे दूपारी 12:00 वाजता ऊपस्थित रहावे असे आव्हान विराट मल्टीपर्पज फाऊन्डेशन च्यावतिने मधुकर पाटिल यांनी केले आहे

    २९ वे झाडीबोली साहित्य संमेलन आणि पितृभाषा