अल खैर फाउंडेशन तर्फे प्रा.सय्यद सलमान यांच्या मागर्दशनात प्रोजेक्टर द्वारे पोलिस भर्ती सेमिनार चे आयोजन

    39

    ✒️बळवंत मनवर(पुसद प्रतिनिधी)
    ___________________________
    पुसद(दि.12डिसेंबर):-दिनांक 11 डिसें रोजी पुसद येथील गडी वार्डात शादी खाना या ठिकाणी रात्री नऊ वाजता पुसद येथील सामजिक कार्यात अग्रेसर असलेल्या युवकांची सामाजिक संघटना असलेल्या अल खैर फाउंडेशन तर्फे नुकत्याच निघालेल्या १८००० पेक्षा अधिक पोलिस भर्ती बद्दल अल्पसंख्याक तरुणांमध्ये जनजागृती व्हावी व पोलिस भर्ती बद्दलच्या शंका दूर करण्यासाठी पुसद येथील प्रसिद्ध पोलीस भर्ती मार्गदर्शक प्रा.सय्यद सलमान सरांच्या मागर्दशनखाली प्रोजेक्टर द्वारे पोलीस भर्ती सेमिनार चे आयोजन करण्यात आले होते.

    या कार्यक्रमाचे मागर्दशक प्रा.सय्यद सलमान सर तर कार्यक्रमाचे अध्यक्ष.मा.मातोंडकर साहेब (वसंत नगर पो.स्टेशन) होते कार्यक्रमाकची सुरवात ही पवित्र कुरआन पठनाने झाली व नन्तर स्वागत करण्यात आले या मध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.मातोंडकर साहेबांच स्वागत अतिक सरांनी केले तर कार्यक्रमाचे प्रमूख अतिथी व मागर्दशक प्रा.सय्यद सलमान सरांच स्वागत अल खैर फाउंडेशन चे सदस्य यांनी केले.नन्तर अध्यक्षीय भाषण मा.मातोंडकर सरांनी केले व त्यात त्यांनी पोलीस विभागातील पद आणि त्याचे कार्य या बाबत माहिती दिली तसेच पोलीस भर्ती मध्ये शारीरिक चाचणी कश्या प्रकारे सराव करावा जेणेकरून जास्त गुण मिळेल याबद्दल आलेल्या विद्यार्थ्यांना मागर्दशन केले.

    व नन्तर मुख्य मागर्दशन कार्यक्रमाला सुरवात झाली ज्यामध्ये प्रा.सय्यद सलमान सरांनी पोलीस भर्तीच्या पार जाहिराती पासून तर शेवटीं निवड होई पर्यत विस्तृत अशी माहिती प्रोजेक्टच्या द्वारे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरून करून विध्यार्थी योग्य अशे मागर्दशन केले आणि पि.पि.टी च्या द्वारे कर्मबद्ध माहिती दिली ज्यामुळे विद्यार्थ्यांचे लक्ष केंद्रित झाले व पूर्ण माहिती सरांनी आधुनिक तंत्रज्ञान वापरून दिली,सरांनी आपल्या मागर्दशनात पोलिस भर्ती मध्ये कश्या चुका होतात आणि ते कश्या दूर कराव्या व योग्य नियोजनबद्ध अभ्यास करून कमी दिवसात जास्त अभ्यास करून पोलीस मध्ये भर्ती होण्यासाठी प्रोत्साहन केले व मुलांना लेखी,व शारीरिक चाचणी बद्दल अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले व मुलांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे सुद्धा दिली म्हणून आलेल्या मुलांनी सुद्धा या सेमिनार मुळे खूप फायदा झाला व मनातील शंका प्रा.सलमान सरांनी दूर केल्या बद्दल आभार व्यक्त केले व शेवटी कार्यक्रमाचे आयोजक व अल खैर फाउंडेशनचे अध्यक्ष गुमाम अहेमद भाऊच्या समारोपीय भाषणाने कार्यक्रमाचे समारोप झाले व यशस्वी असा कार्यक्रम संपन्न झाला.

    प्रा. सय्यद सलमान सर हे अश्या प्रकाचे पोलिस भर्ती जनजागृतीचे कार्यक्रम अवघ्या महाराष्ट्रात करत असून आता पर्यत हजारो तरुणांना त्यांच्या या पोलीस भर्ती सेमीनारचा फायदा झाला व होत आहे. या पोलीस भर्तीच्या सेमिनारच्या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये अल खैर फाउंडेशन चे गुलाम अहेमद, मलिक मिर्झा,मोहम्मद सोहिल,मुशीर अहेमद, सय्यद सज्जाद,आमन खान,मोहम्मद रेहान,अरबाज खान या सर्व तरुण अल खैर फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम करून कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडण्यासाठी मोलाची भूमिका बजावली.

    https://www.purogamiekta.in/2022/12/12/56869/