प्रहार दिव्यांग संघटनेच्या फलकाचे अनावरण संपन्न

    49
    Advertisements

    ✒️चांदू आंबटवाड(मो:-9307896949)नायगाव ता.प्रतिनिधी

    नायगाव(दि.12डिसेंबर):- मा.राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या प्रयत्नांमुळे शासनाला दिव्यांगांसाठी वेगळे द्यावे लागले, हि एक दिव्यांगांसाठी मोठी उपलब्धीच आहे म्हणून आता प्रत्येक दिव्यांग हा प्रहार कडे वळू लागला आहे,प्रहार चे महत्त्व सर्वांना समजू लागले आहे कारण दिव्यांगांमुळे बच्चूभाऊंची ओळख निर्माण झाली नसून ती आज बच्चूभाऊंमुळेच दिव्यांगांना मानसन्मान व हक्क मिळत आहे. याच घटनेचे औचित्य साधून काल देगलूर तालुक्यातील मौजे नरंगल व तमलुर येथे ता.अध्यक्ष ओमप्रकाश नल्लावार यांच्या प्रयत्नांमुळे एकाच दिवशी दोन फलकाचे अनावरण करण्यात आले या फलकाच्या अनावरण प्रसंगी नांदेड जिल्ह्यातील पदसिद्ध पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

    त्यात प्रामुख्याने विठ्ठलराव मंगनाळे नांदेड जिल्हा समन्वयक, विठ्ठलराव देशमुख प्रहार जनशक्ती पक्ष नांदेड जि.अध्यक्ष, गणेश पा.हंडे अजनीकर जनशक्ती पक्ष मराठवाडा जनसंपर्क प्रमुख, पंढरीनाथ हुंडेकर नांदेड जि.अध्यक्ष उत्तर, राजू ईबितवार नांदेड जि.संपूर्ण प्रमुख, मारोतराव मंगरूळे नांदेड जि सचिव, रामदास पा.भाकरे गडगेकर नांदेड जि सहसचिव, श्रीराम पा.पवार नांदेड जि.अध्यक्ष दक्षिण विनोद कोकाटे नांदेड,साईनाथ बोईनवाड नायगाव ता.अध्यक्ष, अनिल पा.शेट्टे राजवाडीकर मुदखेड ता.अध्यक्ष, सौ.आशाताई संजय रेड्डी मँडम बिलोली, बाळासाहेब डाकोरे नांदेड, संजय पा. कौडगावकर लोहा ता. उपाध्यक्ष, माधव नागठानकर जनशक्ती पक्ष उमरी,माधव पांचाळ धर्माबाद,हावगीरराव बेलदारकर, नवनाथ क्षिरसागर, अनिल कांबळे, उमाकांत आटकळे,राजू आंगडे,गंगाधर बिरगोंडा यलपलवार,यादव नल्लामडगे, यशोधरा हानमंत कांबळे, नागमनी कंदलवार,लक्ष्मीबाई मिरकुटे,संघर्ष कुर्हाडे,जयश्री पांचाळ, गंगाराम भंडारे,आम्रपाली वाघमारे, लक्ष्मण कांबळे, विठ्ठल पांचाळ,यशोधरा मारोती कांबळे व नरंगल नगरीचे सरपंच, उपसरपंच,पो.पाटील व गावकरी मोठ्या संख्येने हजर होते

    अन्याया विरूद्ध आवाज उठवणे गुन्हा आहे का?