वारकरी म्हणजे विषमता, द्वेष, अंधविश्वास, पाखंड, अनिष्ट रुढी परंपरा यावर वार करून समजाला संस्कार देण्याचे काम वारकरी संप्रदाय करत असतो. वारकरी संप्रदाय जात, धर्म, पंथ, वंश अशा कोणताही प्रकारचा भेद न पाळता माणवाला माणूस म्हणून स्विकार करून त्यांच्या वर सामाजिक संस्कार घालण्याचे काम वारकऱ्यांचे आहे. वारकरी हे समाजाचे प्रबोधन करून समाजाला दिशा देण्याचे काम करत असतात. संत तुकाराम महाराज यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रबोधन केले तर स्वराज्य उभे राहीले. व छत्रपती शिवाजी महाराज यांनी शत्रुच्या महिलांचा सन्मान केला, सर्व जातीधर्मातील लोकांना एकत्र करून मावळा ही ओळख देऊन एक प्रकारे जातीभेद नष्ट केला. स्वराज्याचा व माणुसकी चा शत्रु ओळखून शत्रु ला वठणीवर आणण्याचे काम केले. स्वराज्या मध्ये ज्यांनी कोणी चुकीचे काम केले, अपराध केला त्याची जात धर्म, नातेसंबंध न बघता शिक्षा करणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे सामाजिक प्रबोधन करणारे तुकाराम महाराज खऱ्या अर्थाने समाजाचे मार्गदर्शक व संत झाले.
आज वारकरी सुषमा अंधारे यांच्या विरोधात आक्रमक झालेले दिसुन येतात. याचे कारण आहे सुषमा अंधारे यांच्या भासणाच्या जुन्या व्हिडीओ क्लिप. सुषमा अंधारे यांच्या जुन्या व्हिडीओ क्लिप बघून राजकीय नेत्यांचे ऐकुन आज वारकरी संप्रदाय आक्रमक झालेला दिसतोय. जर वारकरी संप्रदाय राजकीय नेत्यांच्या सुरात सुरू मिसळून आपला आवाज उठवत असेल तर तो वारकरीच नाही. आणि राजकारण करताना कोणत्या स्तरावर जाऊन करायला पाहिजे याचे सुध्दा भान जर राजकीय नेत्यांना नसेल तर याचा अर्थ यांना फक्त सत्ता संपती मिळवायची आहे. आणि सत्ता संपत्ती मिळवताना राजकारणी लोक कोणाचाही वापर करून घेत आहेत हेच यातुन सिद्ध होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे वारकऱ्यांनी जर राजकीय नेत्यांचे ऐकून वागायला सुरुवात केली तर वारकरी संप्रदाय बदनाम तर होईल परंतु लोकांचा वारकरी संप्रदाया वरचा विश्वास उडून जाईल.
सुषमा अंधारे यांचा चार पाच वर्षां अगोदरचा व्हिडीओ व्हायरल करून त्यावर वारकरी सांप्रयादायाला बोलायला लावले गेले आणि महाराष्ट्रात सर्वत्र एकाच दिवशी वारकरी बोलु लागले. सुषमा अंधारे यांच्या वर खालच्या पातळीवर जाऊन टीका करू लागले. वारकऱ्यांची भाषा बघुन अस वाटत आहेत एक तर हे वारकरी नाही आणि जर वारकरी असतील तर जे बोलत आहेत ते मत त्यांचे नाही. कारण बहुतेक वारकऱ्यांचे बोलणे जवळपास सारखे पण काही काही शब्द वारकऱ्यांनांच नाही तर माणुसकीला लाजवणारे होते. संत तुकाराम महाराजांचे वारकरी अशा प्रकारची भाषा करूच शकत नाही. मग ही भाषा आहे कुणाची? हि भाषा आहे सत्तेची मस्ती असलेल्या आणि डोक्यात विषमता व द्वेषाची घाण असलेल्या राजकीय नेत्यांची.
चार पाच वर्षा अगोदर बोललेल्या वक्तव्याचा व्हिडीओ चार पाच वर्षापुर्वीच व्हायरल झालेला होता, त्यांनी जे काही बोलले होते ते मोठ्या स्टेजवरून बोलल्या होत्या तेव्हा कोणत्याही वारकऱ्यांना ते ऐकू गेले नाही? त्यामुळे वारकऱ्यांकडे मोबाईल नव्हते? मोबाइल मध्ये इंटरनेट सुविधा नव्हती? व्हायरल झालेला व्हिडीओ कोणीच बघितला नव्हता? असे अनेक प्रश्न उपस्थित राहून वारकरी समुदाय हा राजकारणात घूसुन राजकीय नेत्यांच्या इशावर चालतोय की अस झाले आहे. आणि सध्याचे प्रकरण तेच सिद्ध करते. चार पाच वर्षा अगोदर एकही वारकरी त्या व्हिडीओ बद्दल बोलला नाही पण आजच सर्वच्या सर्व बेंबीच्या देठापासून का बोलत आहेत कारण त्यांना बोलवले जात आहे. वारकऱ्यांना आपण वारकरी आहोत याचाच विसर पडलेला आहे. ठिक आहे एखाद्या चे चुकले असेल पण वारकऱ्यांचे कर्तव्य आहे त्या व्यक्तीला समजून सांगणे त्यांचे वैचारिक प्रबोधन करणे. आणि वैचारिक प्रबोधन करून, समजून सांगुन जर व्यक्ती ऐकतच नसेल तर तुम्ही त्या व्यक्तीला विरोध करू शकता तो तुम्हाला संविधानाने दिलेला अधिकार आहे. पण विरोध करताना भाषा कशी असायला पाहिजे, बोलण्याचा आवेश कसा असायला पाहिजे, आणि विषेश म्हणजे समोरची महीला आहे याचा विसर तुम्हाला पडावा आणि तुम्ही नैतिकता, मानसन्मान सोडून एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन बोलावे हे वारकऱ्यांना शोभणारे आहे का? चला हे ही वारकऱ्यांचे मान्य करू सुषमा अंधारे यांनी हिंदु धर्माच्या भावना दुखवल्या आणि चार पाच वर्षानंतर त्या वारकऱ्यांपर्यंत एकाच दिवशी पोहचल्या म्हणून त्यांनी भावनेच्या भरात सुषमा अंधारे यांच्या बद्दल बोलले मग वारकऱ्यांना सरळ प्रश्न आहे. छिंदम पासुन तर दानवे पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करण्यात आला तेव्हा हिंदु धर्माचा अवमान नाही झाला? तेव्हा एकही वारकरी रस्त्यावर नाही आला.
तेव्हा कोणत्या वारकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अवमानाचे व्हिडीओ नाही मिळाले? छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी गप्प बसणारे वारकरी हे समाजाचे होऊ कसे होऊ शकतात? छिंदम, खोले, राज्यपाल, बालाजी संस्थान, त्रिवेदी, दानवे, पडवळकर यांनी छत्रपतींचा अवमान करण्याची मालीकाच सुरू केली पण वारकरी एकही शब्द बोलले नाही का? तर सर्व जन सत्तेत आहेत म्हणून आणि आज आपण सुषमा अंधारे यांच्या बद्दल नैतिकता सोडून बोलता कारण त्या विरोधी पक्षात आहेत म्हणून? वारकऱ्यांनी राजकारण करणे योग्य नाही एकदा तुकाराम महाराज यांचे विचार आत्मसात करण्याची गरज वारकरी लोकांना आहे.
वारकरी लोकांना धर्म नसतो पण चला आपण मान्य करू वारकरी म्हणतात म्हणून त्यांचा धर्म हिंदू सुषमा अंधारे ह्या विषमता, अंधविश्वास यावर बोलल्या म्हणून त्यांनी धर्म बुडवला, धार्मिक भावना दुखावल्या, वगैरे वगैरे जर बोलल्याने धर्माच्या भावना दुखतात तर बाळकृष्ण महाराज, खाडे महाराज यांनी किर्तनाच्या नावाखाली जे काही केले बर केलेच नाही पण ते त्याचे व्हिडीओ ऑडीओ तयार करून शेअर केले तेव्हा धर्माच्या भावना दुखल्या नाहीत का? बाळकृष्ण महाराज, आणि खाडे महाराज यांनी केलेले काम हे धर्माला वर आणणारे होते का? वारकऱ्यांना बाळकृष्ण महाराज व खाडे महाराज यांचे व्हिडीओ मिळाले नाहीत का?
सुषमा अंधारे बोलल्या तर धर्म बुडतो, धर्माचा अवमान होतो, तर बाळकृष्ण आणि खाडे महाराज यांच्या विषयी पण वारऱ्यांनी विधान, विरोध करावा जसा सुषमा अंधारे यांचा केला? आहे शक्य नाही. कारण वारकरी जे बोलत आहेत ती स्क्रिप्ट लिहणारा सत्ताधारी आहे. सत्ते साठी विरोधकांना कमकुवत करावे पण लोकांच्या भावना, आस्था आणि स्वाभिमान यांचाही उपयोग राजकारणात करावा म्हणजे किती निच राजकारण आहे हे. वारकऱ्यांनी राजकारण न करता समाजाचे प्रबोधन करून सर्वांना माणुसकी या बंधनात बांधण्याचे काम करावे. राजकीय स्क्रिप्ट वाचुन वारकऱ्यांनी बोलणे म्हणजे स्वतः चे अस्तित्व दुसऱ्याला बहाल करण्यासारखे आहे. वारकऱ्यांनी चुकीच्या गोष्टींना नक्कीच विरोध करावा पण विरोध करताना शब्दांची मर्यादा ओलांडली जात असेल, महिलांचा सन्मान होत नसेल तर त्यांना वारकरी कसे म्हणायचे? वारकऱ्यांच्या माध्यमातून सत्तेतील सत्ताधाऱ्यांनी जो काही गोंधळ चालवला तो बंद करायला पाहिजे. राजकारण करा पण राजकारण करणे म्हणजे नैतिकता हरवून बसने नव्हे. वारकरी खालच्या भाषेत सुषमा अंधारे यांच्या वर टिका करत आहेत.
वेगवेगळ्या सामाजिक संघटना, राजकीय पक्ष, अभ्यासक, सामाजिक कार्यकर्ते यांना देखील समजले सुषमा अंधारे यांना जाणीव पुर्वक लक्ष केले जात आहे. सर्व जन वारकऱ्यांचे वागणे हे धर्मानुसार नाही, आणि विषेश महिलांबद्दल असे वक्तव्य करू नये असे पडसाद समाजात उमटत असताना स्वतः ला हिंदुत्ववादी समजणारे सरकार, छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेऊन राजकारण करणारे सरकार सुषमा अंधारे यांच्या अवमानाबद्दल काहीच बोलत नाही. हेच आहे का हिंदुत्व? छत्रपती शिवाजी महाराज शत्रुच्या महिलांचा सन्मान करायचे. आणि सध्याचे सत्ताधारी महिलेंचा अवमान उघड्या डोळ्यांनी बघतात पण एकही शब्द सन्मानात बोलत नाही हे कृत्य महाराष्ट्राच्या संस्कृतीला आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांना मुळीच पटणारे नाही. सरते शेवटी वारकऱ्यांनी आपले स्थान व सन्मान राजकारण्याचे ऐकवून गमवू नाही म्हणजे संस्काराची परंपरा कायम राहील पण दोन दिवसापासून वारकऱ्यांचे संस्कार सुद्धां दिसुन येत आहेत.
✒️विनोद पंजाबराव सदावर्ते(रा.आरेगांव,ता.मेहकर)मो:-९१३०९७९३००