आमदार किशोर जोरगेवार यांनी बेळगाव येथे दिल्या जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा

    54
    Advertisements

    ?छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले

    ✒️रोशन मदनकर(उप संपादक)

    चंद्रपूर(दि.16डिसेंबर):-आमदार किशोर जोरगेवार यांनी आज बेळगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन जय भवानी जय शिवाजींच्या घोषणा दिल्यात. यावेळी बेळगाव वासीयांच्या भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पर्यंत पोहचविण्याबाबत येथील नागरिकांना आश्वस्त केले.

    आमदार किशोर जोरगेवार यांनी येथे पोहचल्या नंतर नागरिकांशीही संवाद साधला.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत घेतलेल्या भुमिकेचेही कौतुक केले. केंद्राने या विषयात दखल घेत या प्रश्नावर मार्ग काढण्याची भुमिका घेतली आहे.दोन्ही राज्यातील मुख्यमंत्री यांच्याशी केंद्रीय गृहमंत्री अमीत शाहा यांनी एकत्रीत बैठक घेतली आहे.

    या अगोदर हा वाद मिटविण्यासाठी असे प्रयत्न कधीही करण्यात आलेले नव्हते. त्यामुळे बेळगाव वासीयांनीही महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने सुरु असलेल्या प्रयत्नांचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या पूढे कौतुक केले आहे. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी बेळगाव वासीयांचेही म्हणने ऐकुन घेत त्यांच्या भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पर्यंत पोहचविणार असल्याचे म्हटले आहे. आज येथे पोहचल्या नंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पूष्पहार अर्पण करुन जय जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा दिल्यात.