यंग चांदा ब्रिगेड घुग्घुस तर्फे आ.किशोरभाऊ जोरगेवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन

    53
    Advertisements

    ✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी)

    घुग्घुस(दि.१७ डिसेंबर):-शनिवार रोजी स्नेहप्रभा मंगल कार्यालयात यंग चांदा ब्रिगेडचे अध्यक्ष तसेच अपक्ष आ.किशोरभाऊ जोरगेवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले.

    यावेळी यंग चांदा ब्रिगेड घुग्घुस संघटक विलास वनकर म्हणाले की, महाराष्ट्रातील अनेक मोठ मोठ्या दवाखान्यात रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा झाल्याने रूगणाना आपले जीव गमवायची वेळ येऊ नये यासाठी गावा गावात समाजसेवकानी व विविध पदाधिकारी. नागरिकांनी रक्तदानाचे शिबीर घ्यावेत असे आव्हान केले.करुन आज मा.आ.किशोरभाऊ जोरगेवार यांचा वाढदिवस निमित्ताने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले.
    तसेच बहुजन महिला आघाडी शहर अध्यक्षा सौ.उषाताई आगदारी म्हनाले रक्तदान हेच श्रेष्ठदान देशसेवा आहे.

    यंग चांदा ब्रिगेड कार्यकर्ते तसेच आजुबाजुचा परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात सहभाग शेकडो रक्तदात्यानी रक्तदान केले.

    श्री.सत्यशिव गुरुदेव सेवा मंडळ चे अध्यक्ष मधुकर मालेकर व कार्यकारिणी आवर्जून उपस्थित होते.

    यावेळी यंग चांदा ब्रिगेड घुग्घुस संघटक विलास वनकर, बहुजन महिला आघाडी शहर अध्यक्षा सौ.उषाताई आगदारी, यंग चांदा ब्रिगेड नेते ईमरान खान, स्वप्नील वाढई,सुचितकुमार कल्याण सौदारी, मयुर कलवल कार्यकर्ते उपस्थित होते.