वनविभागाच्या सबसिडी अनुदान वाटपात जनवन समिति अध्यक्षाने केला लाखोचा घोटाळा

    50
    Advertisements

    ?ज्ञानिवंत मांढरे, राष्ट्रपाल गोंडाने आणि ग्रामस्थांनी केली तक्रार

    ?वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली डोळेझाक

    ✒️प्रतिनिधी नागपूर(चक्रधर मेश्राम)

    नागपूर(दि.25डिसेंबर):- तालुक्यातील कुही तालुक्यातील
    मौजा चिकना, येथील भ्रष्टाचारी श्री तुळशीदास कळंभे (जनवन समिती अध्यक्ष तथा उपसरपंच चिकना) व त्यांचे सहकारी श्री गॅस एजेंसी, उमरेड यांनी प्रचंड भ्रष्टाचार केल्याचे उघड झाले असले तरी वरिष्ठ अधिकारी कारवाई करण्यात अपयशी ठरले आहेत असा आरोप तक्रारकर्त्यांनी केला आहे.

    मौजा चिकना हे गाव उमरेड-करांडला वन्यजीव अभयारण्या लगत असून पुनर्वसनाच्या वाटेवर आहे. गावाचे पुनर्वसन होईपर्यंत ग्राम जनांच्या विकासासाठी जनांच्या सहकार्याने वनविभागाची समिती म्हणजे जन वन समिति कार्यरत आहे. या माध्यमातून गावाच्या सुविधांसाठी विविध उपक्रम राबविले जातात, त्यातलाच एक उपक्रम म्हणजे घरगुती गैस सिलेंडर पुनर्भरनावर 75% अनुदान (सबसिडी) आणि याच सबसिडी वाटपात जनवन समिती अध्यक्ष तुळशीदास कळंभे (उपसरपंच) यांनी 4 ते 10 लाखांचा घोटाळा व भ्रष्टाचार केला आहे. याबाबत ३-मार्च-२०२२ रोजी वरिष्ठ वन अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याकडे केली, 22-4-2022 रोजी आठवणपर निवेदनही दिले. पण रीतसर चौकशी अजूनपर्यंत झालेली नाही. जुन-जुलै-2022 मध्ये दुसऱ्यांदा वरिष्ठ वन अधिकारी व जिल्हाधिकारी यांना तक्रार दिली, तरी सुद्धा यावर कोणतीही योग्य चौकशी अद्याप झालेली नाही.

    उलट या प्रकरणावर पांघरून घालून तक्रारकर्त्यांवर दडपण टाकत भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्याचे काम संबंधीत वन अधिकारी करित आहेत. बेकायदेशीर नकद रूपाने 75% सबसिडी वाटप करून भ्रष्टाचार केला. शासनाच्या निर्देशानुसार शासनाच्या सर्व आर्थिक सुविधांचा लाभ लाभार्थ्यांच्या बँक खात्यातच जमा करावे लागते त्यासाठीच गोरगरीब जनतेचे निशुल्क बँक खाते उघडण्याची सुविधा शासनाने जनधन योजनेतून करून दिली. तुलसीदास कळंभे, जन वन समिती अध्यक्ष यांनी मे- 2021 पासुन वनविभागाची 75% सबसिडी पुनर्वाटप करण्यास सुरुवात केली. 861 रु सिलेंडरची किंमत असतांना केंद्र शासनाची 40.10₹ व वनविभागाची 75% = 615₹ अशा दोन रकमा लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा झाल्या. त्यामुळे लाभार्थ्यांच्या खात्यात एकूण 615+40=655₹ जमा झाले व लाभार्थ्यांना सिलेंडर फक्त 205 ₹ ला पडला. सिलेंडरची किंमत 861 ₹ असतांना 84 लोकांची पुनर्वाटपाच्या पहिल्या महिन्याची सबसिडी 615 रू. बँकेत यशस्वीरित्या जमा केली. तरीसुद्धा पुढील महिन्यापासुन बेकायदेशीरपणे 75% सबसिडी नकद वाटने सुरू केले. कोणतीही रक्कम नमूद नसलेल्या रजिस्टर वर लोकांच्या सह्या घेतल्या . त्यामुळे लोकांना 615 रू. ऐवजी 550 रू. हाती लागले हा प्रकार वाढत जाऊन 684 रु. ऐवजी 550 रु. नकदी एवढेच हातात लागले.

    त्यामुळे काही लोकांनी याबाबत जाब विचारले म्हणून नोव्हेंबर-2021 पासून त्यांनी राजकीय क्लेश मनात बाळगून राजू कळंभे याला डावलून फक्त शैलेश जुमडे यांचे कडूनच 228₹ ला पडणारा सिलेंडर 350 ₹ ला मिळण्याची व्यवस्था केली व दोघं मिळून भ्रष्टाचार केला. जन वन समिती गॅस एजेंसीला कमी रकमेचा चैक देत असते व ते पैसे लोकांकडून घेतले जाते.एक सिलेंडर साठी एक सही पाहिजे पण जन वन समिती अध्यक्षाने ज्यांचे सिलेंडर 3 ते 4 महिने संपत नाही अशा लोकांच्या 2 ते 3 ठिकाणी सही घेऊन 1 ते 2 सिलेंडर ची सबसिडी गायब केली. अनधिकृत पणे जन वन समितीचे अध्यक्ष झाले . तुळशीदास कळंभे हे ग्राम पंचायत चिकना चे उपसरपंच आहेत त्यामुळे त्यांनी तहकूब ग्रामसभेत स्वतःच्या अध्यक्षतेखाली जूनी जनवन समिती बरखास्त न करता, उपस्थित लोकांना डावलून आपल्या मनमर्जीने गैरहजर लोकांना समितीत निवड केले व स्वतः समितीचे अध्यक्ष झाले. उपसरपंच हा जन वन समितीचा पदसिद्ध अध्यक्ष नसतो, तो ग्राम सभेतच निवडला जातो, पण तुळसीदास कळंभे स्वतःला पदसिद्ध अध्यक्ष म्हणतो . भटक्या जाती समूहाचे लोक ग्राम सभेत उपस्थित असूनही अनुपस्थित अनुसूचित जनजाती समूहातील व्यक्तीची निवड भटक्या जाती च्या नावावर केली. जन वन समितीत महिलांची निवड करतांना महिला ग्रामसभेने सुचविलेल्या महिलांची शिफारस लक्षात घेणे आवश्यक असते. परंतु त्यावेळी ग्राम पंचायत ने कोणतीही महिला ग्रामसभा घेतली नाही व तुळसीदास कळंभे यांनी आपल्या मनमर्जीने महिलांची निवड केली.

    29-6-2019 चा ठराव वन अधिकाऱ्यांनी समितीत 1/3 ग्राम पंचायत सदस्य पाहिजे असल्याने एक सदस्य कमी असल्याचे सांगत नामंजूर केला. वन परीक्षेत्र अधिकारी कुही हे दीर्घकालीन सुट्टीवर गेल्याचा फायदा घेत पदभार सांभाळणारे वन अधिकारी वाडिघरे यांचेसोबत साठगाठ करित कोरोनाच्या तीव्र प्रादुर्भावात उपसरपंच पदाचा गैरफायदा घेत ग्रामसभेत निवडली जाणारी समिती ग्राम पंचायतच्या मासिक सभेत (26-3-2021) ठराव करून समितीस मान्यता घेतली.पण माहे मे-2021 पर्यंतजन वन समितीचे अध्यक्ष श्री ग्यानिवंत मांढरे हेच होते . जन वन समिती फक्त ग्राम सभेतच निवडली जात असल्याने समितीला ग्रामसभेची मान्यता घेण्यास वन विभागाने 2-10-2021 ला सुचविले त्यामुळे पुन्हा 30-10-2021 च्या तहकुब ग्रामसभेत समितीला मान्यता घेण्यात आली , पण तसा ठराव वन विभागाला लगेच दिला नाही.जन वन समितीची निवड प्रक्रियेची माहिती 31-1-2022 च्या निर्णयानुसार देणे भाग होते म्हणून 1-2-2022 रोजी वन विभागाला ग्रामसभेची मान्यता घेतल्याचे पत्रक दिले.

    10 मार्च 2022 ला जन वन मान्यता मिळाली .जन वन समिती अध्यक्षाची “मी म्हणेन तो नियम” निती व उपसरपंच पदाची हुकूमशाही तुळशीदास कळंभे यांनी स्वतः हुकूमशहा असल्यासारखे कोणताही आदेश नसताना डिसेंबर- २०२१ ला ७५% सबसिडी बंद झाल्याची घोषणा करित सबसिडी बंद ठेवली. तुलसीदास कळंभे यांनी संजय कळंभे यांचॆवर बाहेर शौचस गेल्याचा खोटा आरोप करित १००० रु. दंड लावला व जनवन समिती अध्यक्षास दंड वसुलीचे कोणतेही आदेशपत्र नसुनही उपसरपंच पदाचा गैरफायदा घेत मुला बरोबर स्वतंत्र सिलेंडर असलेल्या बापाला पण 75% सबसिडी पासुन दिड महिना वंचित ठेवले व भर सभेत आरोप सिद्ध न करता बापलेकांची बदनामी केली. स्वतंत्र परिवार व घरमालकी असलेल्या संजय कळंभे यांच्या लहान भावाला सुद्धा ग्राम पंचायतचे दाखले अजूनपर्यंत मिळू दिले नाही. जन वन समितिचे सचिव श्री दबे (वनपाल) यांनी 75% सबसिडी मिळण्यासाठी परवाना सही देऊनही संजय कळंबे च्या वडिलाला 75% सबसिडी तुळसीदास कळंभे यांनी मान्य केली नाही .

    नरेगा मजुरांना कामावरून कमी करण्याचा धाक दाखवत सभेत बोलावणे, गावाची साफसफाई करणे, नाली साफ करणे, गट्ठू लावणे अशी कामे करवून घेतली गेली तसेच 7-5-2022 रोजी या मजुरांचा हल्ला वन परीक्षेत्र अधिकारी कुही यांचे कार्यालयावर केला होता. वन अधिकारी यांनी भ्रष्टाचाराला खतपाणी घालत आगीत तेल टाकण्याचे काम केले. वन परिक्षेत्र अधिकारी कुहि यांनी कायदेशीर चौकशी करणे सोडून तक्रारकर्त्यांना आपल्या कार्यालयात गुन्हेगारासारखे ताबडतोब बोलावून बयान घेतले तसेच तक्रार मागे घेतली नाही तर गावाला मिळणारा फंड काढून टाकून समिति कायमची बंद करू अशी धमकी संबंधित वन अधिकारी यांनी दिली . गावातील लोकांना भडकविन्यासाठी दि. 28-5-2022 रोजी तक्रारकर्त्यांना कोणतीही सूचनापत्र न देता बेकायदेशीर सभा लावली, व गावात गॅस सिलेंडर मिळू नये अशी तक्रार तक्रारकर्त्यांनी केली आहे अशी अफवा पसरविण्यात आली.

    तसेच दि. ३१-५-२०२२ रोजी तक्रारकर्त्याच्या घरी लग्न असल्याचे निमित्य साधत तहकूब ग्रामसभेत जन वन समिति चा कोणताही विषय नसतांना व तक्रारकर्त्यांना कोणतीही नोटिस न देता चर्चा करून आगीत तेल टाकण्याचे काम येथील वन अधिकारी यांनी केले. व पाहिजे तसा ठराव करून घेतला. शेवटी २३-७-२०२२ रोजी वन परिक्षेत्र अधिकारी कुही यानी तक्रारकर्त्यांना कोणतीच नोटीस न देता व गरज नसतांना अनावश्यक लोकांचा, खास करून महिलांचा जमाव करीत सभा लावली. तक्रारीचे कोनतेही निवारण न करता उपसरपंच तुळशीदास कळंभे (जन वन समिति अध्यक्ष) त्यांचे सहकारी यांच्या मदतीने आरोप जाणीवपूर्वक अनावश्यक वाद पेटविण्याचे काम केले व हा तमाशा वन कर्मचारी व वन अधिकारी दर्शक बनून पाहत होते. शेवटी पोलीस अधिकारी मध्यस्थी आले आणि तेव्हा वन अधिकारी यांनी सभा बरखास्त झाल्याचे घोषित केले व सभेचा कोणताच निर्णय लागला नाही.

    माहिती अधिकारान्वये प्राप्त झालेल्या पुराव्यानुसार तसेच तक्रारीत उल्लेख केला तरी सुद्धा वन परीक्षेत्र अधिकारी, कुही यांनी खोटा अहवाल वरिष्ठ वन अधिकारी यांना पाठविला. पण अजून पर्यंत तक्रारी आणि पुराव्यांची कोणतीच सहनिशा केली नाही.त्यामुळे या भ्रष्टाचार प्रकरणात गावकाऱ्यांना न्याय मिळावा, व भ्रष्टाचार करणाऱ्या जन वन समिती अध्यक्ष यांच्यावर कठोर कारवाई करावी, तसेच या भ्रष्टाचाऱ्यांना पाठिंबा देणाऱ्या वन अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.