अत्याचार प्रतिबंधक अधिनियमाच्या अंतर्गत येणारे प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढा : जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार

    60
    Advertisements

    ?जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची सभा

    ✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    चंद्रपूर(दि.13जुलै):- सामाजिक न्याय विभागामार्फत जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची दर महिन्यात आयोजित करण्यात येणारी मासिक सभा दिनांक 9 जुलै 2020 रोजी जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांच्या अध्यक्षतेखाली  वीस कलमी सभागृहात पार पडली.

    अनु.जाती,जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमाच्या अंतर्गत येणारे प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढायच्या सूचना यावेळी जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी संबंधित अधिकारी यांना दिल्यात.

    या बैठकीत 2020 पर्यतच्या माहितीचा आढावा व अत्याचार ग्रस्तांना आर्थिक साहाय्य मंजूरीबाबत,1989 ते जून 2020 पर्यत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 सुधारित नियम 2016 अंतर्गत पोलीस तपासावर प्रलंबित व न्यायालयात प्रलंबित गुन्ह्यांचा आढावा घेण्यात आला. खून, मृत्यू प्रकरणातील पीडित व्यक्तीच्या वारसास नोकरी व पेन्शन देण्याबाबत व अत्याचारग्रस्त व्यक्तींना जातप्रमाणपत्र देण्याबाबत आढावा घेण्यात आला.

    यावेळी अपर पोलिस अधिक्षक प्रशांत खैरे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण प्रसाद कुलकर्णी, आदिवासी विभागाचे सहाय्यक संचालक विनय राठोड, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभागाचे सुनिल जांभुळे तसेच संबधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी  उपस्थित होते.