महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2020 च्या परीक्षा केंद्रांमध्ये बदल करून देण्यात यावे – प्रफुल सिडाम

    62
    Advertisements

    ?आदिवासी विद्यार्थी संघ, विदर्भ-नागपूरची मागणी

    ✒️नागपुर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    नागपूर(16जुलै):- यूपीएससीने कोरोना ची परिस्थिती आणि विद्यार्थी आपल्या स्वगृही परत गेले याची दखल घेत. विद्यार्थ्यांना पूर्व आणि मुख्य परीक्षा केंद्र बदल करण्याची संधी देण्यात आली. त्याचप्रमााणे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2020 च्या पूर्व परीक्षा केंद्रामध्ये बदल करूून देण्यात यावे, अशी मागणी मुख्यमंत्री, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष यांच्याकडे आदिवासी विद्यार्थी संघ विदर्भ नागपूरचे सचिव प्रफुल सिडाम यांनी केली. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने आपल्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षा तारखा संबंधित चिंता कमी झालेली आहे. राज्यसेवेची प्रारंभिक परीक्षा 13 सप्टेंबर 2020 रोजी घेण्यात येणार आहे. राज्य लोकसेवा आयोगाने राज्यसेवेसाठी आवेदन फॉर्म मागितले होते, तेव्हा महाराष्ट्रात कोरोना चा प्रादुर्भाव नव्हता त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या शहरात मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती व नागपूर अशा विभागीय स्तरावर प्रारंभिक परीक्षा साठी केंद्र निवडले आहे. आज ही शहरे करोनाचे हॉस्पॉट शहर ठरले आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्व विद्यार्थी आपल्या स्वगृही परतलेले आहेत. स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी हे बहुतांश शेतकऱ्यांची मुले ग्रामीण भागातून आहे. कोरोना च्या काळात सर्वांचे रोजगार गेले आहेत यात ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचाही समावेश आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आणि आर्थिक परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांची परिस्थिती हलाखीची झालेली आहे. यामुळे विद्यार्थ्यांनी निवडलेल्या पूर्व परीक्षा केंद्रावर जाणे अडचणीचे ठरणार आहेत. याच परिस्थितीचे गांभीर्य जाणून यूपीएससीने विद्यार्थ्यांना पूर्व परीक्षा साठी निवडलेल्या परीक्षा केंद्र बदलण्याचे मुभा देण्यात आली. याच धर्तीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विद्यार्थ्यांचे परिस्थितीचे गांभीर्य जाणून निवडलेली परीक्षा केंद्र बदलण्याची मुभा देण्यात यावी अशी मांगणी आदिवासी विद्यार्थी संघ संघाचे सचिव प्रफुल सिडाम यांनी केली आहे.