इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल 90.66 टक्के

    65
    Advertisements

    ✒️पुणे(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    जालना(अतुल उनवणे):-आज (दि.16 जुलै रोजी इयत्ता बारावीचा निकाल घोषित झाला असून  राज्याचा निकाल 90.66 टक्के लागला आहे यात दरवर्षी प्रमाणे यंदाही मुलींनीच निकालात बाजी मारली.

    महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून राज्याचा निकाल 90.66 टक्के लागला आहे.

    कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 95.89 टक्के तर औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वात कमी 88.18 टक्के लागला आहे.
    राज्यातून या परीक्षेसाठी 14 लाख 20 हजार 575 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्या 14 लाख 13 हजार 687 विद्यार्थ्यांपैकी 12 लाख 81 हजार 712 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
    मुलींचा निकाल : 93.88 टक्के | मुलांचा निकाल : 88.04 टक्के

    विभागीय मंडळ निहाय निकाल

    ● पुणे : 92.50 टक्के

    ● नागपूर : 91.65 टक्के

    ● औरंगाबाद : 88.18 टक्के

    ● मुंबई : 89.35 टक्के

    ● कोल्हापूर : 92.42 टक्के

    ● अमरावती : 92.09 टक्के

    ● नाशिक : 88.87 टक्के

    ● लातूर : 89.79 टक्के

    ● कोकण : 95.89 टक्के