१६ जुलै २०२० दुपारी ४.३० वाजता
?चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या २१८
✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)
चंद्रपूर(दि.१६जुलै(:- जिल्ह्यात बाधितांची एकूण संख्या २१८ झाली आहे. यापैकी १२० बाधित कोरोनातून बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर ९८ बाधितांवर उपचार सुरू आहे. यापैकी १७ जन जिल्ह्याबाहेरील बाधित असून राज्य राखीव पोलीस दलाचे ११ जवान व ६ जन अन्य राज्याचे रहिवासी आहेत.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार कालपर्यंत २१३ असणारी संख्या आज ५ बाधिताची भर पडल्यामुळे २१८ झाली आहे. ५ बाधितामध्ये जिल्ह्यातील तालुक्याच्या व ग्रामीण भागातील नागरिकांचा सहभाग आहे.
यामध्ये नागभीड तालुक्यातील तेलीमेंढा या गावातील ४९ वर्षीय केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांचा समावेश आहे. उत्तर प्रदेशातील अमेठी येथे कार्यरत असलेला हा जवान चंद्रपूरला १२ जुलै रोजी पोहोचला. आल्यानंतर गृह अलगीकरणात होता. १४ जुलैला त्यांच्या स्वॅब घेण्यात आला असून तो पॉझिटिव्ह ठरला आहे.
ब्रह्मपुरी शहरातील विद्यानगर परिसरात राहणारी २५ वर्षीय युवती गोरेगाव मुंबई येथून परत आली आहे.ती आल्यापासूनच संस्थात्मक अलगीकरणात होती. १४ तारखेला स्वॅब घेण्यात आला. १६ जुलैला ती पॉझिटिव्ह ठेवली आहे.
गोंडपिंपरी येथील ३३ वर्षीय फॅक्टरीमध्ये काम करणारे कामगार बिहार येथून रेल्वेने परत आले आहे. आल्यापासून संस्थात्मक अलगीकरणात होते. १३ तारखेला त्यांचा स्वॅब घेण्यात आला असून तो पॉझिटिव्ह ठरला आहे.
हैद्राबाद येथे एका बिस्कीट कंपनीत काम करणाऱ्या २६ वर्षीय युवकाचा स्वॅब देखील पॉझिटिव्ह आला आहे. हैद्राबाद येथून ३० जूनला आल्यानंतर आता पर्यत दोन वेळा त्याची चाचणी केली असता, दुसरी चाचणी पॉझिटिव्ह ठरली आहे.
माणिकगड सिमेंट मध्ये काम करणाऱ्या एका अभियंत्याचा स्वॅब देखील पॉझिटिव्ह आला आहे. नोएडा येथून रेल्वेने १४ जुलै रोजी माणिकगड येथे आल्यानंतर संस्थात्मक अलगीकरणात असलेला हा युवक पॉझिटिव्ह ठरला आहे. यासोबतच गुरुवार दिनांक १६ जुलै रोजी एकूण पॉझिटिव्ह संख्या २१८ झाली आहे. सध्या जिल्ह्यात ९८ संक्रमित असून त्यापैकी कोविड केअर सेंटरमध्ये ७५, जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात २३ असे मिळून एकूण ९८ जणांवर जिल्ह्यात उपचार सुरू आहे. या सर्वांची प्रकृती स्थिर असून आतापर्यंत जिल्ह्यात कोणत्याही बाधिताचा मृत्यू झालेला नाही .