सायकल चालक हे मातृभूमीचे सच्चे सेवक – रामविर श्रेष्ठ

    64
    Advertisements

    ?गडचिरोली सायकल स्नेही मंडळाच्या तिसरा वर्धापनदिन

    ✒️गडचिरोली(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    गडचिरोली(दि.21जुुुलै):-सायकल चालविण्याच्या कार्यात जमीनीशी जुडलेले लोकच ख-या अर्थाने पुढाकार घेत असतात , ते मातृभूमीचे सच्चे सेवक आहे . राजस्थान मधील असाच एक मोठा सायकल चालक समुह सायकल द्वारा दोनशे किलोमीटर चे अंतर संघटीतपणे मार्गक्रमण करतात. दुर्गम भागातील समस्यांचा अभ्यास करून त्या दूर करण्यासाठी प्रयत्न करतात . हे कार्य म्हणजे राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराजांचाच परिवर्तनवादी विचार आहे.पर्यावरण संवर्धनासोबतच मानवी शरीरात रोगप्रतिबंधक शक्ती यामुळे निर्माण होते, असे प्रतिपादन दिल्ली येथील लोकसभा टिव्ही चे अँकर रामविर श्रेष्ठ यांनी आॕनलाईन संदेशात केले.
    ते गडचिरोली सायकल स्नेही मंडळाच्या तिसऱ्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने बोलत होते .कोवीड मुळे यावर्षीचा
    मंडळाचा आॕनलाईन वर्धापनदिन घेण्यात आला. ह्या कार्यक्रमास जिल्ह्याचे पालकमंत्री ना .विजय वडेट्टीवार यांनीही फेसबुकवर संदेश पाठवून सदस्यगणाचे कौतुक केले ते आणि आपल्या संदेशात ते म्हणाले ,
    मनुष्याला निरोगी जीवन जगण्यासाठी तसेच मानवी जीवनाची सायकल उत्तम सुरू राहावी , तसेच पर्यावरण वाचविण्यासाठी प्रत्येकांनी आजच्या काळात सायकल चालविणे अत्यावश्यक असल्याचे ते म्हणाले .
    गडचिरोली जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून सायकल चालवा, पर्यावरण वाचवा , आरोग्यवान बना असा महत्त्वाचा संदेश सायकल रॕलीच्या माध्यमातून
    देत सातत्याने जनजागृती करणारे सायकल स्नेही मंडळ जिल्ह्यात कार्यरत आहे. कोरोना संकट काळात शासनाच्या निर्देशामुळे गेल्या चार महिन्यापासून साप्ताहिक सायकल रॕली बंद केली असली तरी मंडळातर्फे फिजिकल डिस्टनसिंग पाळत अनेकांना साबुण वडी , सॕनिटायझर , मास्क चे मोफत वितरण करण्यात आले होते.मंडळाचे प्रेरक ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी वर्धापनदिनाच्या निमित्ताने पालकमंत्री ना. विजयभाऊ वडेट्टीवार यांची भेट घेऊन त्यांना राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराजांच्या साहित्यावरील विशेष ग्रंथ सस्नेह भेट दिला. गुगल मिटवर झालेल्या कार्यक्रमात खगोलअभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी पर्यावरण , आरोग्य विषयक समस्या आणि सायकल यासंबंधीत सदस्यासह दिलखूलास संवाद साधला.त्यात बंडोपंत बोढेकर , प्रा. विलास पारखी, डाॕ. योगेश पाटील , विठ्ठल कोठारे , विलास निंबोरकर , भोजराज कान्हेकर , प्रमोद राऊत , अरविंद खारकर आदी मंडळी सहभागी झालेली होती. वर्धापनदिनाच्या निमित्ताने दिल्ली येथील लोकसभा टिव्ही चे अँकर रामविर श्रेष्ठ , गडचिरोली मध्यवर्ती बंँकेचे अध्यक्ष प्रंचितजी पोरेड्डीवार , चंद्रपूर येथील पर्यावरण अभ्यासक विजय मार्कंडेवार, गडचिरोली पं.स. सभापती विलास दशमुखे , तेलगांना स्टेटचे सेवामंडळाचे प्रांतप्रचारक टी. संजय आदी मान्यवरांनी आॕडीओ स्वरूपात आॕनलाईन संदेशरूपी मनोगत मंडळास कळविले. यावर्षीच्या सायकल स्नेही पुरस्काराकरीता डाॕ. योगेश पाटील , विलास निंबोरकर आणि भोजराज कान्हेकर यांची सर्वांनुमते निवड करण्यात आली . ह्या उपक्रमात सहभागी झालेल्या मान्यवरांस आॕनलाईन सन्मानपत्र प्रदान करण्यात आलेले आहे.