लग्नात डिजे वाजवून नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी; तलवाडा पोलिसांनी केली डिजे मालकावर कार्यवाही

    58
    Advertisements

    ✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

    बीड(दि.12मे):;)^सध्या लग्नसराई सुरू आसल्याने लग्नात डिजे वाजवण्याचे प्रमाण वाढलेले पाहाव्यास मिळत आहे, लग्नात व ईतर कार्यक्रमात डिजे वाजवुन डिजे मालक कायद्याच्या नियमाचे उल्लंघन करत आहेत. तसेच तलवाडा पोलीस स्टेशन हद्दितील अर्धामसला येथे लग्नात डिजे मालकाने डिजे वाजवुन नियमाचे उल्लंघन केल्याने तलवाडा पोलीसांनी डिजे मालकावर कारवाई केली आहे.

    अशोक महादेव जाधव, रा, सुशी वडगाव, ता. गेवराई असे कारवाई केलेल्या डिजे मालकाचे नाव आहे. तलवाडा पोलीस स्टेशनचे सपोनि शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शानाखाली पोह, झिकरे, पो, ना, कोरडे, पो, का, गायकवाड, चालक जाधव, यांनी ही कार्यवाही केली आहे, तलवाडा पोलीस स्टेशन हद्दित अनधिकृत पणे डिजे वाजऊ नये अश्या कडक सुचना देखील डिजे मालकांना दिल्या आहेत.