चिमूर कृषी उत्पन्न बाजार समिती च्या सभापती पदी मंगेश धाडसे तर उपसभापती पदी रविंद्र पंधरे यांची अविरोध निवड

    49
    Advertisements

    ?शेतकरी विकास परिवर्तन आघाडी व डोंगरे गटाचे वर्चस्व

    ✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

    चिमूर(दि.12मे):-कृषी उत्पन्न बाजार समिती चिमूर च्या सभापती पदाची निवडणूक दि १२ मे ला झाली असता भाजप आमदार बंटी भांगडिया यांच्या शेतकरी विकास परिवर्तन आघाडी गट व सहकार नेते संजय डोंगरे यांच्या पॅनल चे मंगेश धाडसे यांची सभापती तर रवींद्र पंधरे उपसभापती पदी अविरोध निवड करण्यात आली.

    यावेळी नवनिर्वाचित संचालक प्रशांत चिडे, प्रकाश पोहनकर, कैलाश धनोरे,अनिल वनमाळी, घनश्याम डुकरे, संदीप पिसे, भास्कर सावसाकडे , दिनकर सिनगारे ,राजेंद्र बानकर, दशरथ ननावरे, प्रशांत गुरपुडे, मनोहर पिसे ,नंदू गावंडे, रेखा मालोदे, गीता कारमेंगे तर महाविकास आघाडी चे संचालक भरत बंडे उपस्थित होते.

    निवडणूक निर्णय अधिकारी एस बी सहारे यांच्या उपस्थितीत निवडणूक शांततेत पार पडली. प्रभारी सचिव काशिवार व कर्मचारी उपस्थित होते.निवडणूक प्रकिया झाल्यावर भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी जल्लोष व्यक्त करीत शुभेच्छा दिल्या.