✒️धरणगाव प्रतिनिधी(पी डी पाटील सर)
धरणगाव(दि.4ऑक्टोबर)- येथील गुड शेपर्ड इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये बन्सल क्लासेस जळगाव यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. ही स्पर्धा ‘ग्लोबल वार्मिंग’ या विषयावर इ.८ वी ते १० वी च्या विद्यार्थांसाठी घेण्यात आली होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक लक्ष्मणराव पाटील यांनी केले. त्यांनी निबंध स्पर्धेचा उद्देश तसेच कार्यक्रमाची रूपरेषा पाटील सरांनी मांडली. प्रमुख अतिथी चंद्रशेखर कासार (समन्वयक बन्सल क्लासेस) यांनी आपल्या मनोगतातून निबंध स्पर्धेत शाळेतील विदयार्थ्यांचा उस्फूर्त सहभाग, लेखनातील मुद्देसूदपणा, योग्य विषय मांडणी यावर भाष्य केले तसेच अभ्यासाच्या इतर बाबींचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे, मुख्याध्यापिका नाजनिन शेख, व्यवस्थापक जगन गावित, बन्सल क्लासेसचे संजय सक्सेना आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आले. यामध्ये प्रथम क्र. तेजश्री अनिल बाविस्कर (१००१ रु.), द्वितीय क्र. रोहन जगदीश पवार (५०१ रु.रोख) आणि तृतीय क्र. नम्रता प्रमोद गरुड (३०१ रु.रोख ) रोख स्वरूपात देण्यात आले. आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.