कंत्राटीकरण व खाजगीकरणाचे परिपत्रक रद्द करा-म्हसली ग्रामपंचायत ने मांडला मिटींग मध्ये ठराव

    390
    Advertisements

    ✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

    चिमुर(दि.6ऑक्टोबर):- चिमुर वरून काही अंतरावर असणाऱ्या म्हसली ग्रामपंचायतने कंत्राटीकरण व खाजगीकरणाचे परिपत्रक रद्द करण्यासाठी मागील महिन्यात मासिक सभेत ठराव मांडण्यात आला.

    राज्य सरकारने खाजगी कंपन्यांची निवड करुण विविध शासकीय विभागात त्यांच्या माध्यमातून कंत्राटी पदभरतीचा निर्णय घेतल्याने लाखो सुशिक्षित बेरोजगारांवर उपासमारीचे संकट उभे ठाकले आहे.१८/९/२०२३ ला शाळेचे खाजगीकरण करण्याचा तुघलकी शासणनिर्णय काढला. त्यानंतर लगेच ३०/९/२०२३ ला २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतल्याने गरीब, होतकरू, हुशार विद्यार्थ्यांचे शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

    कंत्राटीकरण व खाजगीकरणाचे पडसाद गावोगावी उमटत आहेत. चिमूर तालुक्यातील म्हसली ग्रामपंचायतने कंत्राटीकरण व खाजगीकरणाचे परिपत्रक रद्द करण्याचा ठराव मासिक सभेत अध्यक्षांच्या परवानगीने येणा-या विषयात घेऊण पारित करण्यात आला.

    यावेळी म्हसली ग्रामपंचायत चे सरपंच संकेत सोनवाणे, ग्रामपंचायत सदस्य चारूशीला कावरे, पद्माकर पेंदाम, मंगला देवतळे तथा राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाचे तालुकाध्यक्ष कवडू लोहकरे व नागरिक गन उपस्थित होते.