✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)मो:-8605592830
चिमूर(दि.11सप्टेंबर):-ग्रामगीता महाविद्यालय चिमूर येथे माजी विद्यार्थी सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेमध्ये मोठ्या संख्येने माजी विद्यार्थ्यांनी आपली उपस्थिती दाखवली. कार्यक्रमादरम्यान माजी विद्यार्थ्यांनी आपले अनुभव तसेच महाविद्यालयाविषयीचे आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमात महाविद्यालयातील माजी विद्यार्थी श्री योगेश मेश्राम या विद्यार्थ्यांचा उत्कृष्ट कार्यासाठी सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अमीर धमानी तसेच प्रमुख पाहुणे म्हणून आई.क्यू.ए.सी. समन्वयक डॉ. निलेश ठवकर, प्रा. नागेश ढोरे, माजी विद्यार्थी सचिन भरडे आणि जयराम वावरे उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. अमीर धमानी यांनी महाविद्यालयात केलेल्या नवनवीन उपक्रम, विकास कार्यक्रमांबद्दल माहिती दिली, तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे आयोजन माजी विद्यार्थी विभाग समन्वयक प्रा. समीर भेलावे यांनी तर प्रास्ताविक प्रा. नागेश ढोरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.