✒️अहमदनगर(पुरोगामी न्युज नेटवर्क)
अहमदनगर(दि.11ऑक्टोबर):-“नवीन लिहिणाऱ्यांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देणाऱ्या शब्दगंध च्या वतीने हा सुंदर सोहळा पार पडत असून महाराष्ट्रातील अनेक नवोदित लेखक,कवींना यामुळे विचारपीठावर व्यक्त होण्याची संधी मिळत आहे,शब्दगंधचे हे कार्य अलौकिक आहे,” असे मत माजी संमेलनाध्य,गीतकार.कवी बाबासाहेब सौदागर यांनी व्यक्त केले.
पंधराव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनातील काव्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते.
यावेळी विचारपिठावर कविवर्य चंद्रकांत पालवे,डॉ.विशाल इंगोले,भरत दौंडकर,डॉ.कमर सरूर प्रा.शशिकांत शिंदे हनुमंत चांदगुडे उपस्थित होते. या काव्यसंमेलनाचे बहारदार सूत्रसंचालन नांदेड येथील प्रसिद्ध सूत्रसंचालक अजीम नवाज राही व कवयित्री शर्मिला गोसावी यांनी केले.या काव्यसंमेलनात डॉ.विशाल इंगोले,नितीन चंदनशिवे,हनुमंत चांदगुडे,रवींद्र मालुंजकर,भरत दौंडकर. अबेद शेख, माधुरी चौधरी,संजय चौधरी,शशिकांत हिंगोणेकर,अंजली दीक्षित,डॉ.कमर सरूर,डॉ. संजय बोरुडे,प्रा.शशिकांत शिंदे,चंद्रकांत पालवे,हुमायून आतार,ज्योती तोटेवार,अमोल घाटविसावे,राम गायकवाड,चंद्रकांत कर्डक,ज्योती सोनवणे यांच्यासह इतर अनेक कवी सहभागी झाले होते.
रविवारी सकाळी झालेल्या काव्यसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी माजी संमेलना अध्यक्ष,चित्रपट गीतकार,कवी प्रकाश घोडके होते. “मानवी जीवनात साहित्यालातीष्य महत्व असून त्यामुळे माणूस माणसात येतो,कविता हि जगण्यातून येत असते,अस्सल कविता हि वेदनेची कविता असते”असे मत प्रकाश घोडके यांनी व्यक्त केले.या काव्यसंमेलनात बाळासाहेब गिरी,डॉ.शंकर चव्हाण,डॉ.चं.वि.जोशी, किरण भावसार,प्रवीण घुले,डॉ.बेंनजिर शेख,आशा डांगे, स्वाती अहिरे,एम.पी.दिवान,अर्जुन देशमुख, माधव संत,ऐश्वर्यालक्ष्मी सातभाई,प्रशांत वाघ,हबीब भंडारे,स्वाती पाटील, अरविंद ब्राह्मणे,अनंत कराड,शिरीष जाधव,वर्षा भोईटे, विलास पंचभाई,डॉ.महावीरसिंह चौहान,विनोद शिंदे,रिता जाधव, लक्ष्मण खेडकर यांच्यासह इतर कवी सहभागी झाली होते.या काव्यसंमेलनाचे सूत्रसंचालन मारुती सावंत,स्वाती ठुबे व सरोज अल्हाट यांनी केले
समारोपानंतर झालेल्या तिसऱ्या काव्य संमेलनामध्ये मीराबक्ष शेख,डॉ.गणी पटेल,लेविन भोसले,प्रमोद येवले,सुदर्शन धस,पांडव पुरी,बाळासाहेब कोठुळे,स्वाती मुळे, वैभव रोडी,प्रशांत रोडी,हरिभाऊ नजन,आनंदा साळवे,क्रांती करंजगिकर,जयश्री मंडलिक, कैलास साळगट,डॉ.संजय पाईकराव,आत्माराम शेवाळे,मधुमिता निळेकर,विजय हुसळे, बाळासाहेब मुन्तोडे,संतोष कानडे,डॉ.अशोक ढगे,ऋता ठाकूर,सुजाता पुरी, स्वाती झेंडे,संगीता दारकुंडे,भाऊसाहेब सावंत,ओमप्रकाश देंडगे,जितेन सोनवणे,ज्ञानदेव उंडे,सुजाता पवार, प्रशांत सूर्यवंशी,स्वाती राजेभोसले,देविदास बुधवंत हे सहभागी झाले होते. या काव्य संमेलनाचे सूत्रसंचालन डॉ.रमेश वाघमारे व कार्यवाह सुभाष सोनवणे यांनी केले. तिन्ही काव्यसंमेलनात मिळून महाराष्ट्रातील जवळपास २०५ कवींनी कविता वाचन केले.
शेवटी शाहिर भारत गाडेकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आमदार संग्रामभैय्या जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र उदागे,सुनील गोसावी,भगवान राऊत,डॉ.अशोक कानडे, डॉ.किशोर धनवटे,राजेंद्र फंड,सुदर्शन धस,जयश्री झरेकर,राजेंद्र पवार,डॉ.अनिल पानखडे,डॉ.बाप्पू चंदनशिवे,बाळासाहेब शेदूरकर,डॉ.गुंफा कोकाटे,सो.संजय दवंगे,सुरेखा घोलप बबनराव गिरी,डॉ.तुकाराम गोंदकर,राजेंद्र चोभे डॉ.अनिल गर्जे,ऋषिकेश राऊत,शर्मिला गोसावी यांनी विशेष परिश्रम घेतले.