11 वर्षीय मुलीवर अत्याचार करणारा सराईत गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात

    207
    Advertisements

    ✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

    उमरखेड(दि. 12 ऑक्टोंबर):-तालुक्यातील पो.स्टे. पोफाळी येथे अप.क्र. 251/2023 कलम 363, 307, 342,376 (ए.बी) 506 भा.दं.वी. सहकलम 4,6,8 बालकांचे लैंगीक अपराधापासुन संरक्षण अधिनियम 2012 अन्वये गुन्हा नोंद असुन पो.स्टे पोफाळी हद्दीतील एका शाळकरी मुलीवर एका मोटार सायकल क्रमांक MH 29 A 2142 वर आलेल्या इसमाने लैंगीक छळकरुन तिला जिवाने ठार मारण्याचा प्रयत्न केल्याने पो.स्टे. पोफाळी येथे वरील प्रमाणे गुन्हा नोंद असुन आरोपीचे शोधाकरीता पोलीसांची वेगवेगळी पथके नेमुन आरोपीचा तांत्रीक मुद्यावर शोध घेवुन आरोपी नामे आजीज खा मोहमद खाँ पठाण वय 49 वर्ष रा. नागापुर (रुपाळा) याला अटक करण्यात आली आहे.

    सदर आरोपी वर 22 ते 25 गुन्हे दाखल आहेत त्यामधील दहा गुन्हे 302 मर्डर चे असून नांदेड येथे दिनांक 27 सप्टेंबर 2023 रोजी कारागृह येथून आरोपीची सुटका झाली होती.

    सुटका झाल्यानंतर त्याने नियोजन करून एखाद्या मुलीला टारगेट करून तिची फसवणूक करून सुनसान जागा शोधुन अत्याचार करण्याचे कृत्य आरोपीने ठरविले होते.
    पोलिसांनी शोध चक्र फिरवुन सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

    व पीडित मुलगी ही यवतमाळ येथील सरकारी दवाखान्यात भरती आहे व तिची तब्येतही आता बरी आहे.

    अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय येथे पत्रकार परिषदेमध्ये दिली.

    सदर अटक कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. पवन बनसोड साहेब मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. पियुष जगताप साहेब मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रदीप पाडवी सा. परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विनायक कोते सा. उमरखेड ठाणेदार शंकर पांचाळ, यांचे मार्गदर्शनात उमरखेड उपविभागीतील पो.स्टे. उमरखेड, पोफाळी, महागांव तसेच उमविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय पथक उमरखेड, स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी आपसात योग्य ताळमेळ साधुन यशस्वीरीत्या कामगीरी पार पाडली असुन सदर गुन्ह्याचा पुढील तपास ठाणेदार पो.स्टे. पोफाळी हे करीत आहेत.