सकल मराठा समाजाला सरसगट आरक्षण मिळावे म्हणून मराठा मंत्री, आमदार, खासदारांना लीहले रक्तरंजित पत्र

    245

    ✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

    उमरखेड (दि. 20 ऑक्टोंबर):-सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीसाठी उमरखेड तालुक्यामध्ये मागील एक महिन्यापासून महिन्यापासून सकल मराठा समाजाच्या वतीने आमरण उपोषण व साखळी उपोषण करण्यात आले दिनांक 14 ऑक्टोंबर रोजी आंतरवली सराटी येथील मनोज पाटील जरांगे यांनी घेतलेल्या अभूतपूर्व सभेनंतर दिनांक 24 ऑक्टोबरला सरकारला दिलेली मुदत संपत सकल मराठा समाजाला महाराष्ट्र शासनाने मागुन घेतलेली.

    24 ऑक्टोबर रोजी संपत असुन महाराष्ट्र शासनाकडून मराठा आरक्षण बाबत ठोस निर्णय न आल्यास दि. 25 ऑक्टोबर सर्व पक्षीय मंत्री, खासदार, आमदार यांनी आपण आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अन्यतः महाराष्ट्रातील सकल मराठा समाज आपणांस गावबंदी करेल अशा पद्धतीचे रक्तरंजीत पत्र उमरखेड येथील मागील 18 दिवसापासून आमरण उपोषण व साखळी उपोषण करणारे उपोषण करते सचिन गाडगे यांनी दिला आहे.यावेळी सकल मराठा समाज उपस्थित होता.