उमरखेड येथे सम्राट अशोक यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासह धम्म यात्रे चे स्वागत…

    252

    [हजारो उपासक उपासिकांनी व तरुण मंडळींनी घेतले सम्राट अशोकांची दर्शन]

    ✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

    उमरखेड (दि. 20 ऑक्टोबर):-प्रियदर्शनी चक्रवर्ती महान राजा सम्राट अशोक (इ.स.पू.304 – मृत्यू इ.स.पू. 232 ) हे भारतीय सम्राट आणि मौर्य घराण्यातील तिसरे शासक होते.त्यांनी प्राचीन भारतावर इ.स.पू. 272 – इ.स.पू. 232 दरम्यान राज्य केले. त्यांना चक्रवर्ती सम्राट अशोक, महान अशोक आणि अशोक द ग्रेट नावांनीही ओळखले जाते.

    सम्राट अशोक हे भारतीय इतिहासातील सर्वात महत्त्वाचा लोककल्याणकारी राजा ज्यांनी अखंड भारताचा बहुतांश भाग काबीज केला होता. आपल्या सुमारे 40 वर्षांच्या विस्तृत राज्यकाळात त्यांनी पश्चिमेकडे अफगाणिस्तान व थोडा इराण, पूर्वेकडे आसाम तर दक्षिणेकडे म्हैसूरपर्यंत आपल्या राज्याचा विस्तार केला.

    केरळ राज्यात येणारे सम्राट अशोकाने बांधलेले बुद्ध विहार आणि त्यानंतर ब्राह्मणांनी ते जोर जबरदस्तीने अय्यप्पा मंदिरात रूपांतर केले पण केरळ उच्च न्यायालयाने ते बुद्ध विहार असल्याचा निकाल दिल्यामुळे सदर धम्मयात्रा चक्रवर्ती सम्राट अशोक यांचा पूर्णाकृती पुतळा घेऊन “बुद्धिस्ट फेडरल निती मुव्हमेंट” द्वारा धाम्मयात्रा निघाली आहे.

    सदर रॅली ही उमरखेड शहरांमधील विश्वरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्या समोर आल्याने धम्मयात्रा रॅलीचे स्वागत करण्यात आले.

    डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या पुष्पहार अर्पण करून जयघोष करत सुमेध बोधी बुद्ध विहार येथे धम्मयात्रा आयोजकांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. व त्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली.

    या कार्यक्रमाचे प्रमुख डॉ. भारती प्रभू (चेन्नई) अशोक सरस्वती (नागपूर), डॉ.प्रशांत इंगोले (वाशिम), डॉ.प्रा.धनराज तायडे, (उमरखेड), विजयराव खडसे (माजी आमदार उमरखेड) इत्यादी जन उपस्थित होते.तसेच समता सैनिक दलाकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

    या कार्यक्रमाचे आयोजन आत्माराम हापसे यांच्यासह अनेक सहकारी व सुमेध बोधी बुद्ध विहार बोरबन कडून करण्यात आले होते.सदर उपचारा नागपूर दीक्षाभूमी ला जाऊन तेथे दान देण्यात येणार आहे व सदर धम्म यात्रा संपन्न होईल अशी माहिती आयोजकांनी दिली व सुमेध बोधी बुद्ध विहार समितीस “बुद्ध अँड हिज धम्म” हा ग्रंथ संगीता बरडे, माया ताई हापसे, केशरबाई पाईकराव यांना व्यासपीठावर धम्मायात्रा आयोजकांनी भेट दिला.यावेळी हजारोच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.