43 खोल्यांचे असेसमेंट अजून बाकी. 14 खोल्या अनाधिकृत, न्यायदेवता स्टे कशी देणार?

    119
    Advertisements

    (पॅन्थर डॉ. राजन माकणीकर यांचा सवाल)

    ✒️मुंबई(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

    मुंबई(दि.29ऑक्टोबर):- आधीच्या 43 खोल्यांचे असेसमेंट अद्यापही भरणे शिल्लकच असून आताच्या 14 खोल्यांच्या अनधिकृत बांधकामाला न्यायदेवता स्टे देईल कशी? असा प्रश्न विद्रोही पत्रकार डॉ. राजन माकणीकर यांनी उपस्थित केला आहे.*

    पवई टुरिस्ट हॉटेल अनधिकृत बांधकाम प्रकरणी बृहन्मुंबई च्या एस विभागाकडून हॉटेल मालक के. अशोक राय यांना नोटीस काढल्यानंतर मालक राय याने न्यायलाया कडे स्टे मिळवण्यासाठी करिता धाव घेतली आहे.

    याच हॉटेल मध्ये आधीच्या 43 खोल्या आहेत त्याचे असेसमेंट अजूनही पूर्ण भरले नाही. पालिका अधिकाऱ्यांना हाताशी धरून अपूर्ण असेसमेंट भरले असून कामात कुचराई करून शासनाच्या असेसमेंट मध्ये चोरी करणाऱ्या तत्कालीन अधिकारी व राय यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी डॉ. राजन माकणीकर यांनी केली आहे.

    महाराष्ट्र राज्याच्या मुंबई महानगरात अशोक राय याचे अनधिकृत बांधकामाचे जमिनी बल्कवण्याचे, सरकारचा असेसमेंट चोरी करण्याचे, चुकीचा धंदा लपवण्याचे व चादर पलटी हॉटेल उभारून त्यात नाबालिक मुलामुलींना शारीरिक संबंध जोडण्यासाठी हॉटेलची खोली देण्याचे काम बहुतांश प्रमाणात आहेत.

    लवकरच पूर्ण कागदपत्र व इव्हिडन्स सह पत्रकार परिषद घेत आहे, के अशोक राय याला नागड करून जेलमध्ये पाठवणार आहे. असंख्य मानहानीचे दावे माझ्यावर असून एकही दावा अजून सिद्ध झाला नाही शिवाय ज्याला मानच त्यांची हानी कसली? असे मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया संविधान पक्षाचे राष्ट्रीय मुख्य सचिव डॉ. राजन माकणीकर यांनी व्यक्त केले.