पोहरादेवी येथे सुरु असलेल्या उपोषण कार्यकर्त्याच्या उपोषण मंडपाला आमदार इंद्रनिल नाईकांची भेट

    80
    Advertisements

    ✒️बळवंत मनवर(पुसद प्रतिनिधी)

    पुसद(दि.29ऑक्टोबर):-पोहरादेवी येथे विमुक्त जाती अ. मध्ये होणारी बोगस घुसखोरी साठी एस.आय.टी. नेमण्याकरिता तसेच वारे कमिटी दिलेल्या अहवालनुसार ५० बोगस जात वैधता प्रमाणपत्र धारक आणि प्रमाणपत्र देणारे अधिकारी यांच्यावर कारवाई होणे.हि काळाची गरज आहे

    वास्तविक पहाता २०१७ ची रक्त नाते संबंधाची अधिसूचना रद्द करणे या मागण्या घेऊन बंजारा समाजाच्या वतीने राजेश राठोड, शाम राठोड, अमोल राठोड, संतोष राठोड अन्नत्याग, जलत्याग उपोषण करीत आसुन. त्याच्या मागण्या रास्त आहे.

    शासनाने त्वरित ह्या मागण्या मान्य कराव्यात या करिता उपोषण ठिकाणी आमदार इंद्रनील नाईक यांनी भेट दिली. उपोषणकर्त्याच्या तब्येतीची विचारपूस केली वैद्यकीय सेवा स्वीकारण्याची विनंती केली.या मागण्या करिता मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन त्वरित मागण्या मान्य करण्यासाठी सामाजिक जबाबदारी म्हणून प्रयत्न करणार असे आश्वासन यावेळीदिले आहे.